07 August 2020

News Flash

अंकिताची तब्येत बिघडताच सुशांतच्या जीवाची झाली होती घालमेल; थ्रोबॅक व्हिडीओ व्हायरल

अंकिताच्या काळजीने सुशांत झाला होता हवालदिल

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याच्या ‘दिल बेचारा’ या चित्रपटाचं टायटल ट्रॅक अलिकडेच प्रदर्शित झालं. हे गाणं पाहिल्यानंतर सुशांतचे अनेक जुने व्हिडीओ चाहत्यांनी सोशल मीडियावर शेअर करत त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. यामध्येच सुशांत आणि अंकिताचा ‘झलक दिखला जा’ या रिअॅलिटी शोमधील एक थ्रोबॅक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात अंकिता अचानक आजारी पडल्यामुळे सुशांतच्या जीवाची झालेली घालमेल स्पष्टपणे या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘झलक दिखला जा’ या कार्यक्रमात सुशांत आणि अंकिताने भाग घेतला होता. या शोमध्ये डान्स करत असताना अचानकपणे अंकिताची तब्येत बिघडली आणि तिला चक्कर आली. अंकिताची ही अवस्था पाहिल्यानंतर कार्यक्रमाची टीम तिच्या दिशेने धावली. परंतु, अन्य स्पर्धकांच्या रांगेत बसलेल्या सुशांतच्या जीवाची मात्र घालमेल झाल्याचं पाहायला मिळालं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत आहे.

अंकिताला चक्कर आल्यानंतर सुशांत पटकन स्पर्धकांच्या रांगेतून उठला आणि तिच्या दिशेने जाण्यास निघाला. परंतु, त्याच वेळी कार्यक्रमाची टीम स्टेजवर पोहोचल्यामुळे तो पुन्हा त्याच्या जागेवर गेला. मात्र त्यावेळी अंकितासाठी त्याला वाटत असलेली काळजी त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होती. तो त्याच जागेवर सतत येरझऱ्या घालत होता.

दरम्यान, अंकिता आणि सुशांत यांची लव्हस्टोरी साऱ्यांनाच माहित आहे. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे एकमेकांच्या प्रेमात पडलेली ही जोडी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडींपैकी एक होती. मात्र काही कारणास्तव ते दोघंही विभक्त झाले. मात्र आजही त्यांच्या प्रेमाचे किस्से ऐकायला मिळतात. सुशांतने १४ जून रोजी राहत्या घरी आत्महत्या केली. त्याच्या निधनामुळे साऱ्यांनाच धक्का बसला असून अंकिताने सुशांतच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांची भेटही घेतली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2020 10:32 am

Web Title: sushant singh rajput looks upset after seeing ankita lokhande bad health video viral ssj 93
Next Stories
1 अभिनेत्रीला करोनाचा संसर्ग; दोन महिन्यापूर्वीच दिलाय बाळाला जन्म
2 राधिका आपटेचा हॉलिवूडप्रवास; ‘अ कॉल टू स्पाय’साठी करते दिवसरात्र मेहनत
3 Video : अशोक पत्की सांगतात, ‘काळोख दाटूनी आला’ गाण्यामागील मजेदार किस्सा
Just Now!
X