बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी आत्महत्या केली. त्याच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला. सुशांतच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्याचे जुने फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे दिसत आहे. नुकताच सुशांतचा एका लहान मुलासोबत खेळतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सुशांत एका लहान मुलासोबत खेळताना दिसत आहे. वूम्प्लाने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. पण सुशांतचा हा व्हिडीओ कुठला आहे? व्हिडीओमधील लहान बाळ कोण आहे? हे अद्याप समोर आलेले नाही.
पाहा : महागड्या गाड्या ते चंद्रावर जमीन.. जाणून घ्या सुशांत सिंह राजपूतच्या संपत्तीबद्दल
सुशांतच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे.
सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असल्याचे म्हटले जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही. सुशांतने आजवर अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. त्याने छोट्या पडद्यावरील मालिकेत काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्यानंतर २०१३मध्ये त्याने ‘काइ पो चे’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’, ‘ड्राइव्ह’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या.