News Flash

‘सत्याच्या बाजूने खंबीरपणे उभे राहा’; सुशांतच्या बहिणीचं आवाहन

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला नवीन वळण

सुशांत व त्याची बहीण श्वेता

अभिनेता सुशांत सिंह राजपूतला न्याय मिळावा यासाठी आता त्याची बहीण श्वेता सिंह किर्तीने हिने देशातील जनतेला विनंती केली आहे. इन्स्टाग्रामवर देवदेवतांचा फोटो पोस्ट करत श्वेताने सर्वांना सत्याच्या बाजूने खंबीरपणे उभं राहण्याचं आवाहन केलं आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर दीड महिन्यांनी त्याचे वडील के. के. सिंह यांनी पाटणा पोलिसांकडे अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून रियाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘सर्वजण एकीने खंबीरपणे उभे राहुयात आणि सत्याची साथ देऊयात’, अशी पोस्ट श्वेताने लिहिली आहे. रियाविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर सुशांतची एक्स गर्लफ्रेंड व अभिनेत्री अंकिता लोखंडे हिनेसुद्धा सोशल मीडियावर ‘सत्याचा विजय होतो’, अशी पोस्ट लिहिली होती.

आणखी वाचा : अभिषेक बच्चनने रुग्णालयातून पोस्ट केला ‘हा’ फोटो

१४ जून रोजी सुशांतने मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र सुशांतच्या वडिलांनी रियावर गंभीर आरोप करत तिच्याविरोधात तक्रार दाखल केली. रियावर आत्महत्येस प्रवृत्त करण्याबरोबरच इतरही गंभीर आरोप सुशांतच्या वडिलांनी केले आहेत.

दुसरीकडे रिया चक्रवर्तीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सुशांतच्या आत्महत्येचा तपास पाटणा पोलिसांकडून मुंबई पोलिसांकडे देण्यात यावा यासाठी तिने याचिका दाखल केली आहे. तर अटकपूर्व जामिनासाठीही तिचे वकील सतीश मानशिंदे प्रयत्न करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 1:58 pm

Web Title: sushant singh rajput sister shweta asks india to stand up for him ssv 92
Next Stories
1 प्राजक्ता माळी देणार होती ‘जुळून येती रेशीमगाठी’ला नकार, कारण…
2 “देशद्रोही म्हणाल तर लक्षात ठेवा मी बॉक्सर आहे, मी…”; ट्रोलर्सवर इरफानचा मुलगा संतापला
3 सुशांत सिंह आत्महत्या : “मुंबई पोलीस दलातील कुणीतरी रिया चक्रवर्तीला मदत करतंय”
Just Now!
X