News Flash

“सुशांतच्या आत्महत्येबाबत कळताच अंकिताला फोन लावला आणि..”; प्रार्थना बेहरेनं व्यक्त केल्या भावना

रविवारी (१४ जून) सुशांतने मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत भूमिका साकारलेली अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवर शोक व्यक्त केला. “सुशांत मला त्याची छोटी बहीण मानायचा. एकत्र काम करताना आम्ही बऱ्याच गप्पा मारायचो. पण गेल्या मालिका संपल्यानंतर फारसा संपर्क राहिला नाही. सुशांतच्या आत्महत्येच्या घटनेनंतर अंकिता लोखंडेला फोन केला असता ती सतत रडत होती. कृपया तिला या घटनेसाठी जबाबदार मानू नका,” अशी विनंती तिने नेटकऱ्यांना केली. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत ती बोलत होती.

“मालिकेनंतर आम्ही दोघांनी एकत्र चित्रपटाच्या प्रवासाला सुरुवात केली. अभिनेता म्हणून मी त्याचा प्रवास पाहिलाय. आमच्या दोघांचा पहिला चित्रपट एकाच महिन्यात प्रदर्शित झाला होता. त्याच्या पहिल्या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला मी गेले होते. त्याच्या आत्महत्येच्या घटनेवर कसं व्यक्त व्हावं हेच मला कळत नाहीये. अभिनेत्यांचं आयुष्य फार सुंदर आणि ग्लॅमरस असतं असं अनेकांना वाटतं. मात्र खऱ्या आयुष्यात तसं काही नसतं. अंकिताला फोन केला तेव्हा तीसुद्धा खूप रडत होती. तिच्या सोशल मीडियावर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. मात्र तिचासुद्धा आदर करणं खूप महत्त्वाचं आहे. एकेकाळी ते रिलेशनशिपमध्ये होते. मात्र त्यानंतर दोघंही आपापल्या वैयक्तिक आयुष्यात पुढे निघून गेले. सुशांतच्या आत्महत्येसाठी अंकिताला जबाबदार ठरवणं खूप चुकीचं आहे”, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या.

आणखी वाचा : “एकमेकांची उणीधुणी नंतर काढा सर्वात आधी…”; विवेक ओबेरॉयने इंडस्ट्रीला सुनावलं

रविवारी (१४ जून) सुशांतने मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही. पण नैराश्यामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचललं असं म्हटलं जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2020 5:25 pm

Web Title: sushant singh rajput suicide pavitra rishta co star prarthana behere reveals ankita lokhande is crying inconsolably ssv 92
Next Stories
1 “बॉलिवूड घराणेशाहीमुळे ग्रासलं आहे”; सुशांतचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
2 करोनाची चाचणी करण्यासाठी अभिनेत्रीनं सलमानकडे मागितले पैसै
3 Lockdown : ‘आईच्या त्या प्रश्नांची किंमत कळते’; ‘या’ अभिनेत्याने शेअर केला बालपणीचा फोटो
Just Now!
X