25 November 2020

News Flash

“सुशांतला वैयक्तिकरित्या ओळखत नव्हतो”; महेश भट्ट यांचा पोलीस चौकशीत दावा

रिया आणि सुशांतच्या नात्यावर महेश भट्ट यांनी दिली प्रतिक्रिया

“मी सुशांतला केवळ दोन वेळाच भेटलो होतो. त्याचा आणि माझा काहीही संबंध नाही”, असा खळबळजनक दावा निर्माता महेश भट्ट यांनी केला आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपुतने गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी सोमवारी २७ जुलै रोजी महेश भट्ट यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. या चौकशीत त्यांच्यावर केले जाणारे सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले. सुशांतच्या मृत्यूशी त्यांचा काहीही संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलं.

अवश्य पाहा – “सलमानच्या घरात तीन महिने राहिल्यानंतर…”; अभिनेत्याने उडवली जॅकलीनची खिल्ली

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार जवळपास दोन तास महेश भट्ट यांची चौकशी केली गेली. या चौकशीत त्यांनी अनेक चकित करणारे दावे केले. त्यांच्या मते सुशांतच्या वैयक्तिक आयुष्याशी त्यांचा काहीही संबंध नव्हता. आपल्या संपूर्ण आयुष्यात केवळ दोनच वेळा त्यांची आणि सुशांतची भेट झाली होती. २०१८ साली एका पुस्तक प्रकाशनाच्या वेळी ते सुशांतला पहिल्यांदा भेटले. त्यानंतर २०२० मध्ये त्यांची दुसरी भेट झाली. यावेळी त्यांनी केवळ चित्रपट आणि सामाजिक मुद्द्यांवरच चर्चा केली होती. रिया आणि सुशांतच्या नात्याबद्दल त्यांना काहीच माहित नव्हतं. त्यांनी कधीही सुशांतला सोड असा सल्ला रियाला दिला नव्हता. असं महेश भट्ट या चौकशीत म्हणाले.

अवश्य पाहा – करोनाची भीती; ‘या’ अभिनेत्रीच्या घरातच तयार केला मालिकेचा सेट

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येला आता एक महिन्यांपेक्षा अधिक वेळ होऊन गेला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत ३८ जणांची चौकशी केली आहे. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परिणामी अनेक कलाकार व राजकिय नेत्यांनी सुशांत मृत्यू प्रकरणाची जबाबदारी CBI कडे सोपवावी अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विनंती करण्यास सुरुवात केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2020 12:39 pm

Web Title: sushant singh rajput sushant only twice mahesh bhatt to police mppg 94
Next Stories
1 कधीकाळी ‘हा’ स्टारकिड होता तैमूरपेक्षाही अधिक लोकप्रिय!
2 सुशांत सिंहच्या वडिलांचा मुंबई पोलिसांच्या तपासावर विश्वास नाही; वकिलांचा खुलासा
3 ‘अधीरा’चा नवा अवतार; ‘केजीएफ चॅप्टर – २’ मधील संजयचा लूक आला समोर
Just Now!
X