बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. वयाच्या ३४व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. सुशांतच्या निधनानंतर त्याच्या टीमने त्याचे विचार शेअर करण्यासाठी एक वेबसाइट लाँच केली आहे. या वेबसाइटचे नाव सेल्फम्यूजिंग डॉट कॉम (selfmusing.com) असे आहे. तसेच ही वेबसाइट सुशांतचे स्वप्न असल्याचा खुलासा टीमने केला आहे.

सुशांतच्या टीमने सोशल मीडियावर त्याच्या वेबसाइटची लिंक शेअर करत ‘तो आपल्याला सोडून गेला असला तरी त्याच्या आठवणी आपल्यामध्ये आहेत. आम्ही सुशांतची #selfmusing वेबसाइट लाँच केली आहे. सुशांतसाठी चाहतेच गॉडफादर होते’ असे म्हटले आहे.

सुशांतने छोट्या पडद्यावरील मालिकेत काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्यानंतर २०१३मध्ये त्याने ‘काइ पो चे’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या.