News Flash

सुशांतला आगळीवेगळी श्रद्धांजली; चाहत्याने तयार केला मेणाचा पुतळा

सुशांतच्या आठवणीत व्याकूळ झालेल्या चाहत्याने तयार केला पुतळा; व्हिडीओ होतोय व्हायरल

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आता दोन महिने उलटून गेले आहेत. सीबीआय, ईडी आणि एनसीबी मार्फत या प्रकरणाचा तपास सुरु आहे. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान एका चाहत्याने सुशांतला श्रद्धांजली वाहण्यासाठी त्याचा मेणाचा पुतळा तयार केला आहे. या पुतळ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

अवश्य पाहा – “चाहत्याला हवंय भाजपामधून बिहार निवडणूकीचं तिकिट”; सोनू सूदने दिला भन्नाट रिप्लाय

पश्चिम बंगालमधील आसनसोल येथे राहणाऱ्या सुकांतो रॉय या मुर्तीकाराने सुशांतचा मेणाचा पुतळा तयार केला आहे. हा मुर्तीकार सुशांतचा खूप मोठा चाहता आहे. सुशांतच्या मृत्यूमुळे तो खूप दु:खी आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या अभिनेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी त्याने हा पुतळा तयार केला आहे.

अवश्य पाहा – “पॉर्नस्टार शब्दाचा विरोध करणारे सनी लिओनीला आदर्श कसे मानतात?”

“लंडनच्या मादाम तुँसा या म्युझियममध्ये भारतातील अनेक नावाजलेल्या कलाकारांचे पुतळे आहेत. परंतु सुशांतसारख्या गुणी अभिनेत्याचा पुतळा कुठेही नाही. त्यामुळे सुशांतबद्दलचं प्रेम व्यक्त करण्यासाठी मी या पुतळ्याची निर्मिती केली. शिवाय हा पुतळा मी सुशांतच्या कुटुंबीयांकडे सोपवणार आहे.” अशी प्रतिक्रिया मुर्तीकार सुकांतो रॉय याने एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत दिली. त्याने निर्माण केलेला हा पुतळा हुबेहुब सुशांत सारखा दिसतोय. या आगळ्या वेगळ्या श्रद्धांजलीसाठी सुशांतच्या चाहत्यांनी सुकांतोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 3:41 pm

Web Title: sushant singh rajputs wax statue in west bengal mppg 94
Next Stories
1 “मणिकर्णिका, जा चीनवर हल्ला कर; तुझ्या घरापासून ‘एलएसी’वर जायला एकच दिवस लागतो”
2 “…तर मी ट्विटर कायमचं सोडेन”; कंगना रणौतनं दिलं आव्हान
3 ‘प्रेम पॉइजन पंगा’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप
Just Now!
X