बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने घराणेशाहीला कंटाळून आत्महत्या केल्याचे म्हटले जात होते. तसेच सुशांतकडून काही चित्रपटदेखील काढून घेण्यात आले असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता दिग्दर्शक अनुराग कश्यपने करण जोहरच्या यशराज फिल्मसोबत काम करण्यासाठी त्याच्या एका चित्रपटाला सुशांतने नकार दिला असल्याचे सांगितले आहे.

नुकताच अनुराग कश्यपने ‘एनडीटीव्ही’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने सध्या सुरु असलेल्या घराणेशाही या वादावर वक्तव्य केले. तसेच त्याने सुशांतच्या करिअर विषयी देखील काही गोष्टी सांगितल्या. ‘सुशांत एक यशस्वी अभिनेता होता. प्रत्येकजण आपले करिअर हे आपल्या पद्धतीने निवडतो. तुम्ही कोणत्या गोष्टी निवडता, तुम्ही कोणासोबत काम करता या गोष्टींमुळे तुमचे करिअर बनते. सुशांत एक यशस्वी अभिनेता होता आणि त्याने सर्व गोष्टी स्वत: निवडल्या होत्या’ असे अनुराग म्हणाला.

आणखी वाचा : ‘एक बायको सांभाळली जात नाही आणि..’, असे ट्रोल करणाऱ्याला अनुरागने दिले उत्तर

अनुराग आणि सुशांतची ओळख ‘गँग्स ऑफ वासेपुर’ या चित्रपटानंतर झाली होती. त्या भेटीविषयी बोलताना अनुराग म्हणाला ‘त्यावेळी मुकेश छाबरा (दिल बेचारा चित्रपटाचे दिग्दर्शक) माझ्या ऑफिसमध्ये काम करायचे. सुशांत तेव्हा तेथे आला आणि मी म्हणालो, यार तू बिहारचा आहेस. आपली पहिले भेट झाली असती तर मी माझ्या चित्रपटात तुला काम दिले असते.’ त्यानंतर अनुराग कश्यपने दिग्दर्शक अभिषेक कपूरला सुशांत विषयी सांगितले. कारण अभिषेक त्यावेळी ‘काई पो छे’ या चित्रपटासाठी अभिनेत्याच्या शोधात होता.

पाहा : २५० कोटींची मालकीण माधुरी दीक्षित राहते मुंबईतील आलिशान बंगल्यात, पाहा फोटो

तसेच ‘हंसी तो फंसी’ या चित्रपटासाठी सुशांतची निवड करण्यात आली असल्याचे अनुरागने सांगितले. चित्रपटातील अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी परिणीती चोप्राला ऑफर देण्यात आली होती. त्यावेळी परिणीती यशराज फिल्मसाठी काम करत होती. ‘यशराज फिल्मसने सुशांतला फोन केला आणि म्हटले की आम्ही तुला एक ऑफर देतो. तू शुद्ध देसी रोमॅन्समध्ये काम कर. त्यावेळी सुशांत, मुकेश आणि आम्ही सर्वजण माझ्या ऑफिसमध्ये बसलो होतो. त्याने यशराजची ऑफर स्वीकारली आणि हंसी तो फंसी चित्रपटाला नकार दिला. एक चित्रपट जो आउटसायडरवर आधारित होता त्याला सुशांतने नकार दिला कारण यशराजकडून या चित्रपटासाठी त्याला परवानगी हवी होती’ असे अनुराग म्हणाला.

पाहा : बॉलिवूडची ‘दामिनी’ मीनाक्षी शेषाद्री राहत असलेले अमेरिकेतील आलिशान घर पाहिलेत का?

त्यानंतर २०१६मध्ये अनुराग कश्यपने सुशांतला आणखी एका चित्रपटाची ऑफर दिली होती. पण सुशांतने या चित्रपटाला देखील नकार दिला. ‘२०१६मध्ये एमएस धोनी हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी मुकेश छाबडा सुशांतकडे गेले आणि म्हणाले, अनुरागकडे एका चित्रपटाची स्क्रिप्ट आहे आणि तो उत्तर प्रदेशमधून आलेल्या एका कलाकाराच्या शोधात आहे. त्यानंतर काही दिवसांनंतर धोनी हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट हिट ठरला. पण सुशांतने मला कॉल बॅक केला नाही. मला वाईट वाटले नाही’ असे अनुराग म्हणाला.

पाहा :  ‘या’ अभिनेत्रींनी चित्रपटांसाठी घेतले होते अभिनेत्यांपेक्षा जास्त मानधन

सुशांत करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनमध्ये काम करण्यासाठी फार उत्सुक होता, असेही अनुराग पुढे म्हणाला. ‘सुशांत एक खूप चांगला अभिनेता होता. पण त्यावेळी त्याने ड्राइव्ह हा निवडला आणि माझ्या चित्रपटाला नकार दिला’ असे अनुराग म्हणाला.