24 November 2020

News Flash

‘या’ चुकीमुळे सुजान खानचे इन्स्टाग्राम अकाऊंट झाले हॅक

तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती...

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुजान खान हिचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाले होते. या संदर्भातील माहिती सुजानने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दिली आहे. दरम्यान तिने या पोस्टमध्ये चाहत्यांना सावध राहण्यास सांगितले असून एका चुकीमुळे अकाऊंट हॅक झाल्याचे सांगितले आहे.

‘माझे इन्स्टाग्राम अकाऊंट एका फेक इमेलद्वारे हॅक करण्यात आले आणि ते अकाऊंट इन्स्टाग्राम असल्याचे भासवत होते. ते अधिकृत नसल्याचे मला कळाले नाही आणि मी तेथे खाली असणाऱ्या बटणावर क्लिक केले. मी तुम्हाला सर्वांना सावध करण्यासाठी ही नोट लिहित आहे. कृपया कोणत्याही इमेल आयडीवर विश्वास ठेवू नका आणि क्लिक करु नका’ असे तिने म्हटले आहे.

पुढे पोस्टमध्ये सुजानने इन्स्टाग्रामचे आभारही मानले आहेत. ‘याकडे तातडीने लक्ष दिल्याबद्दल आणि माझे अकाऊंट परत मिळवून दिल्याबद्दल इन्स्टाग्रामचे खूप आभारा’ असे म्हणत तिने इन्स्टाग्रामचे आभार मानले आहेत.

सुजानच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत. एकता कपूरने यावर कमेंट करत मी यावर क्लिक केले होते. तर स्मृती खन्नाने तिला देखील असा मेसेज आला होता असे म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 11:13 am

Web Title: sussanne khan reveals her instagram account was hacked avb 95
Next Stories
1 ..म्हणून अजय देवगणने आजपर्यंत नाही पाहिला काजोलचा DDLJ
2 ‘धडाकेबाज’ दिग्दर्शक महेश कोठारे ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’वर
3 ‘माझ्यावर खोटे आरोप’; हृतिकसोबतच्या नात्यावर उर्वशी रौतेला व्यक्त
Just Now!
X