27 February 2021

News Flash

बिबट्याची गावकऱ्यांनी काढली मिरवणूक; व्हिडीओ पाहून स्वरा भास्कर संतापली

स्वराच्या मतांशी आथिया शेट्टी देखील सहमत

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. यावेळी स्वरा एका बिबट्याच्या व्हिडीओमुळे चर्चेत आहे. एका बिबट्याला मारुन त्याच्या मृतदेहाची गावकऱ्यांनी मिरवणूक काढली. या कृतीबाबत स्वराने संताप व्यक्त केला आहे.

सोशल मीडियावर एका मृत बिबट्याचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये गावकरी बिबट्याच्या मृतदेहाची मिरवणूक काढताना दिसत आहेत. ही घटना आसाममधील गुहावटी येथील असल्याचे म्हटले जात आहे. याप्रकारावर स्वराने संताप व्यक्त केला आहे. “भयानक घटना” असं स्वराने याला प्रकाराला म्हटलं आहे. स्वराच्या मतांशी अभिनेत्री आथिया शेट्टी देखील सहमत आहे. तिने स्वराचे ट्विट रिट्विट करुन त्यावर “हे अगदी घृणास्पद आहे.” अशा आशयाची कॉमेंट केली आहे.

स्वराचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. स्वरा यापूर्वी मजुरांना केलेल्या मदतीमुळे चर्चेत होती. तिने मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी सोनू सूदला मदत केली होती. तिला लेडी सोनू सूद असेही म्हटले जात होते. मजुरांना मदत करताना काढले गेलेले तिचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2020 5:33 pm

Web Title: swara bhasker angry reaction on killing of leopard in assam mppg 94
Next Stories
1 “आजही असं वाटतंय की, इरफान माझ्यासोबतच आहे; माझ्याशी बोलतोय”
2 मुंबई पोलिसांचं ‘उरी’स्टाइल टि्वट; ‘हाऊज द जोश’ऐवजी विचारतायत ‘हा’ प्रश्न
3 ‘हा’ संगीतकार आयुष्यात पहिल्यांदाच करणार मतदान
Just Now!
X