पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल २४ मार्च रोजी सर्वात मोठी घोषणा केली. त्यांनी संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर केले आहे. हा लॉकडाउन २१ दिवसांसाठी असणार आहे. म्हणजेच १४ एप्रिलपर्यंत हा लॉकडाउन सुरु असणार आहे. यादरम्यान लोकांना घराबाहेर पडता येणार नाही. मोदींच्या या घोषणेनंतर अभिनेत्री स्वरा भास्करने एक ट्विट करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.

स्वराने काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस संपूर्ण देशात लॉगलाउन जाहीर केल्यानंतर एक ट्विट केले. त्या ट्विटमध्ये तिने रडण्याचे इमोजी वापरुन मला घरी परत यायचे आहे असे लिहिले होते. सध्या सोशल मीडियावर स्वराचे हे ट्विट तुफान व्हायरल होत आहे.

स्वराचे हे ट्विट पाहता ती परदेशात आहे का काय? किंवा तिच्या घरापासून लांब कोणत्या ठिकाणी आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण स्वरा भारतात आहे की परदेशात हे अद्याप समोर आलेले नाही. स्वरा भास्कर सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजिक विषयांवर उघडपणे तिचे मत मांडत असते. बऱ्याचदा तिला ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. पण या सर्वाचा स्वरावर काडीमात्र फरक पडत नसल्याचे दिसत आहे.

स्वरा भास्कर सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजिक विषयांवर उघडपणे तिचे मत मांडत असते. बऱ्याचदा तिला ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. पण या सर्वाचा स्वरावर काडीमात्र फरक पडत नसल्याचे दिसत आहे.

करोना व्हायरससंबंधी दररोज चिंता वाढवणाऱ्या बातम्या येत असताना आता एक दिलासा देणारी बातमी सुद्धा समोर आली आहे. देशाच्या वेगवेगळया भागातील करोना बाधित ४८ रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशात २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. नरेंद्र मोदींनी घराची लक्ष्मणरेषा ओलांडू नका नका असं आवाहन करताना करोना रुग्णांच्या उपचारासाठी १५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती दिली. सध्या देशातील करोनाग्रस्तांचा आकडा ५५० वर पोहोचला आहे.