News Flash

“लोकं मला साऊथची स्वरा भास्कर म्हणत…”, सिद्धार्थच्या ट्वीटला स्वराने दिले उत्तर

सध्या स्वराचे हे ट्वीट चर्चेत आहे.

तमिळ सुपरस्टार सिद्धार्थ हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो सतत सामाजिक विषयावर बिनधास्तपणे त्याचे मत मांडताना दिसतो. बऱ्याच वेळा त्याला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. नुकताच त्याने केलेले एक ट्वीट चर्चेत होते. या ट्वीटमध्ये त्याने ‘मला लोकं साऊथची स्वरा भास्कर म्हणतात’ असे सांगितले होते. हे ट्वीट पाहून अभिनेत्री स्वरा भास्करने देखील मजेशीर उत्तर दिले आहे.

सिद्धार्थने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक ट्वीट केले होते. ‘हिंदी बोलणारे लोक मला साऊथची स्वरा भास्कर म्हणत आहेत. मला स्वरा भास्कर म्हणणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की मला कधीही, केव्हाही आनंदाने स्वरा भास्कर बनायला आवडेल. ती खूप क्यूट आहे’ या आशयाचे ट्वीट त्याने केले होते.

सिद्धार्थच्या ट्वीटवर स्वराने मजेशीर उत्तर दिले आहे. ‘तू भारताचा सिद्धार्थ आहेस आणि मी त्यासाठी तुझे आभार मानते… तू हॉट आहेस’ या आशयाचे ट्वीट स्वराने केले आहे. सध्या त्या दोघांचेही ट्वीट सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

काही दिवसांपूर्वीच सिद्धार्थला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. त्याने भाजपाचे खासदार तेजस्वी सूर्या यांची तुलना दहशतवादी अजमल कसाबशी केली होती. तसेच त्याने भाजप नेत्यांनी त्याचा नंबर लीक केल्याचा देखील आरोप केला होता. “भाजपा सदस्याने माझा फोन नंबर लीक केला होता. गेल्या २४ तासात मला आणि माझ्या परिवाराला ५००हून अधिक बलात्काराच्या आणि मारुन टाकण्याच्या धमक्या आल्या आहेत. सगळे नंबर त्यांच्या भाजपा कनेक्शन आणि डीपीसहीत मी रेकॉर्ड करुन ठेवले आहेत आणि आता ते पोलिसांकडे देत आहे. मी शांत बसणार नाही. तुम्ही प्रयत्न करत राहा” असे त्याने म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2021 3:41 pm

Web Title: swara bhasker reacts on siddharth comment avb 95
Next Stories
1 शिल्पा शेट्टीचे संपूर्ण कुटुंब करोना पॉझिटिव्ह
2 दिग्गज संगीत दिग्दर्शक वनराज भाटिया यांचे निधन
3 नितीन देसाई यांच्या एनडी स्टुडिओला भीषण आग
Just Now!
X