News Flash

बाळाला कडेवर घेऊन महिला कॉन्स्टेबल करतेय ड्यूटी; व्हिडीओ शेअर करत स्वरा म्हणाली…

पाहा व्हिडीओ

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. स्वरा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कधी कोणावर टिका करते तर कधी लोकांना प्रेरणा देणाऱ्या पोस्ट शेअर करताना दिसते. नुकताच स्वराने असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ एका महिला कॉन्स्टेबलचा आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

स्वराने गगनदीप सिंग नावाच्या ट्विटर युजरचे ट्विट रिट्विट केले आहे. या व्हिडीओत प्रियांका नावाची एक महिला कॉन्स्टेबल बाळाला कडेवर घेऊन ड्यूटी करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ चंदीगढचा असल्याचे समोर आले आहे. हा व्हिडीओ शेअर करत स्वराने टाळ्या वाजवण्याचे इमोजी वापरले आहे. स्वराने त्या महिला कॉन्स्टेबलचं कौतुक केलं आहे.

स्वराला ‘तनु वेड्स मनु’, ‘रांझणा’, ‘चिल्लर पार्टी’, ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटांत भूमिका साकारल्या आहेत. स्वरा ‘जहां चार यार’ या आगामी चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. या चित्रपटासाठी ती पुन्हा एकदा ‘तनु वेड्स मनु’ या चित्रपटाच्या निर्मात्यांसोबत पुन्हा एकदा एकत्र येत असल्याच्या चर्चा आहेत. या सोबत काही दिवसांपूर्वी तिची नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘भाग बीनी भाग’ ही सीरिज प्रदर्शित झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2021 11:29 am

Web Title: swara bhasker shared video of constable priyanka who controlling traffic while holding her baby dcp 98
Next Stories
1 त्या कार्यक्रमात भेट झाली अन्…, जाणून घ्या किरण आणि अनुपम खेर यांची लव्ह स्टोरी
2 शितलीच्या ‘लग्नाची पिपाणी’, शिवानी बावकर पुन्हा चर्चेत
3 Video: अनिता हसनंदानीने मुलाच्या कानात गुणगुणला गायत्री मंत्र, अशी होती चिमुकल्याची प्रतिक्रिया
Just Now!
X