News Flash

सुशांतने अभिनेत्रीसोबत गैरवर्तन केलं होतं? स्वस्तिका मुखर्जीचा खुलासा

'सुशांत सेटवर असला की...'; वाचा स्वस्तिका मुखर्जीने काय सांगितलं

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा ‘दिल बेचारा’ हा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला. सुशांतचा अखेरच्या ठरलेल्या या चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. या चित्रपटातील सुशांतचे काही डायलॉग्सही लोकप्रिय ठरत आहेत. त्यामुळे सध्या ‘दिल बेचारा’ आणि सुशांत सिंह राजपूत यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. याच चर्चांमध्ये मध्यंतरी सुशांतने ‘दिल बेचारा’च्या सेटवर सहकलाकार संजना सांघीसोबत गैरवर्तन केल्याचं म्हटलं जातं होतं. मात्र याप्रकरणी संजनाने एका मुलाखतीत सत्य परिस्थिती सांगितली असून तिच्यानंतर अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जीनेदेखील मौन सोडलं आहे. ‘सुशांतने सेटवर कधीच गैरवर्तन केलं नाही’, असं तिने ‘पिंकव्हिला’सोबत बोलताना सांगितलं आहे.

काही काळापूर्वी अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर MeTooचे आरोप केले होते. तनुश्रीनंतर #MeToo या मोहिमेअंतर्गत कलाविश्वातील अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाच्या फोडली. यात अनेक दिग्गज कलाकारांची नावं समोर आली होती. त्यातच दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या नावाचादेखील समावेश करण्यात आला होता. सुशांतने ‘दिल बेचारा’ चित्रपटातील सहकलाकार संजना सांघीसोबत गैरवर्तन केल्याचं म्हटलं जातं होतं. यावर संजनाने सत्यपरिस्थिती सांगितल्यानंतर स्वस्तिका मुखर्जीनेदेखील सेटवर सुशांतचं वर्तन कसं होतं हे सांगितलं आहे.

“सेटवर असताना सुशांतने संजनासोबत कधीच गैरवर्तन केलं नाही. तिला त्याच्यासोबत काम करताना कधीच अवघडल्यासारखं झालं नाही. मी एक स्त्री आहे, जर सेटवर असं काही घडलं असतं. तर मला ते प्रथम लक्षात आलं असतं. मी चित्रपटात संजनाच्या आईची भूमिका साकारली आहे. जेव्हा सुशांतविषयी या चर्चा होऊ लागल्या आम्हां सगळ्यांना धक्का बसला. अनेक जणांनी मला मुकेशचं वर्तन कसं आहे हेदेखील विचारलं. तसंच जर संजनासोबत काही गैरवर्तन झालं असतं, तर सेटवरील लोकांच्या माध्यमातून मला ती गोष्ट पटकन समजली असती. परंतु, असं काहीच झालं नव्हतं”, असं स्वस्तिका म्हणाली.

पुढे ती म्हणते, “आईची भूमिका साकारत असल्यामुळे मी संजना आणि सुशांत यांच्यासोबत जास्त वेळ होते. अनेक वेळा आम्ही तिघं एकत्र जेवलो आहे. मात्र चित्रपटातील कलाकार किंवा सेटवरील अन्य स्त्रियांना सुशांतमुळे कधीच अवघडल्यासारखं वाटलं नाही. उलटपक्षी तो सेटवर असताना सकारात्मक वातावरण असायचं”.

दरम्यान,२०१८ मध्ये सुशांतने ‘दिल बेचारा’च्या सेटवर संजना सांघीसोबत गैरवर्तन केल्याचं आरोप करण्यात आले होते. मात्र या आरोपांवर स्वस्तिकाप्रमाणेच संजनानेदेखील मौन सोडलं. सुशांतने कधीच माझ्यासोबत गैरवर्तन केलं नव्हतं असं तिने एका मुलाखतीत सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2020 9:08 am

Web Title: swastika mukherjee refutes metoo allegations against sushant singh rajput have never seen sanjana sanghi feeling uncomfortable ssj 93
Next Stories
1 सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी करण जोहरचा जबाब नोंदवला जाणार
2 “सत्ता पिपासू लोकांमुळे लोकशाही धोक्यात येईल”; राजस्थान सत्ता नाट्यावर अभिनेता संतापला
3 सुशांतला ‘ती’ ऑफर कधी दिलीच नव्हती, महेश भट्ट यांचा मुंबई पोलिसांकडे खुलासा
Just Now!
X