News Flash

Video : स्वप्निल जोशी-सिद्धार्थ चांदेकरचा भन्नाट ‘बॉटल कॅप चॅलेंज’; तुम्हीही पोट धरून हसाल!

सोशल मीडियावर 'बॉटल कॅप चॅलेंज'ची क्रेझ

स्वप्निल जोशी

सोशल मीडियावर सध्या ‘बॉटल कॅप चॅलेंज’ची क्रेझ पाहायला मिळतेय. पायाने पहिल्याच प्रयत्नात बाटलीचं झाकण उडवायचं असं काहीसं हे चॅलेंज आहे. ऐकायला जरी हे सोपं वाटत असलं तरी करायला मात्र ते तितकंच अवघड आहे. बॉलिवूडच्या अनेक मंडळींनी हे आव्हान स्वीकारलंय. ‘स्टार प्रवाह’वरील ‘जिवलगा’ मालिकेतील कलाकारांनीही हे चॅलेंज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पण यात थोडी गंमत आहे.

‘जिवलगा’ मालिकेतील काव्या म्हणजेच अमृता खानविलकरने हे चॅलेंज एका झटक्यात पूर्ण केलं तर तिकडे निखिल आणि विश्वास म्हणजेच सिद्धार्थ चांदेकर आणि स्वप्निल जोशीने अनोख्या ढंगात हे चॅलेंज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. ‘जिवलगा’ मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियावर हे व्हिडीओ पोस्ट केले असून नेटिझन्सनी त्याला भरभरुन प्रतिसाद दिला आहे.

या व्हिडीओत स्वप्नीलने चॅलेंज पूर्ण करण्यासाठी समोर बॉटल ठेवली आणि गोल फिरून त्याचं झाकण उडवण्याचा प्रयत्न करण्यापूर्वीच सिद्धार्थने पाणी पिण्यासाठी ती बॉटल उचलली. हे पाहून स्वप्नील दंगच राहिला. आपण चुकलोय हे लक्षात येताच सिद्धार्थने ती बॉटल पुन्हा जागेवर ठेवली. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 2:23 pm

Web Title: swwapnil joshi and siddharth chandekar funny bottle cap challenge ssv 92
Next Stories
1 कंगनाच्या बहिणीने म्हटलं ‘सस्ती कॉपी’, तापसीने दिलं सडेतोड उत्तर
2 मुलीसाठी अक्षय कुमारने केला ‘हा’ चित्रपट
3 साहोमधील ‘सायको सैय्या’ गाण्यात प्रभास-श्रद्धाची भन्नाट केमिस्ट्री
Just Now!
X