News Flash

दिग्दर्शकाने बेंबीवर चक्क नारळ फेकला होता- तापसी पन्नू

तापसीने या मुलाखतीत दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करताना आलेला विचित्र अनुभव सांगितला.

तापसी पन्नू

‘पिंक’ या सुपरहिट चित्रपटामुळे नावारुपाला आलेली अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत तापसीने इंडस्ट्रीतील तिच्या स्ट्रगलविषयी सांगितलं. यावेळी तिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आलेला विचित्र अनुभवसुद्धा सांगितला.

”बेंबीबद्दल दाक्षिणात्य सिनेसृष्टीत एवढं कुतूहल का असतं हेच मला कळत नाही. ज्यांनी मला तेलगू सिनेसृष्टीत आणलं ते दिग्दर्शक अभिनेत्रींना सिनेसृष्टीत लाँच करण्यासाठीच ओळखले जातात. माझ्याआधी त्यांनी श्रीदेवी आणि जयसुधा या अभिनेत्रींना लाँच केलं होतं. मी श्रीदेवी आणि इतर अभिनेत्रींचे व्हिडिओ पाहिले होते. चित्रपटात प्रत्येकीवर फुलं किंवा फळं फेकलेले एखादे दृश्य असायचेच. जेव्हा माझी वेळ आली तेव्हा त्यांनी माझ्या बेंबीवर चक्क नारळंच फेकले. बेंबीवर नारळ फेकण्यात कसली कामुकता आहे हे मात्र मला कळले नाही,” असं ती म्हणाली.

आणखी वाचा : ”मी ‘पनौती’ असल्याचं त्याने इंडस्ट्रीत पसरवलं होतं”; तापसी पन्नूने सांगितला धक्कादायक अनुभव 

याच दिग्दर्शकावर नंतर तापसीने एका व्हिडीओत मस्करीत निशाणादेखील साधला होता. ”दाक्षिणात्य सिनेसृष्टीत मी फक्त मोहक भूमिकाच करु शकते, असं वाटत होतं. पण जेव्हा त्यांनी पिंक आणि नाम शबाना हे चित्रपट पाहिले तेव्हा त्यांना मी अभिनयही करू शकते याची उपरती झाली,” असा उपरोधिक टोला तापसीने मारला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2019 12:13 pm

Web Title: taapsee pannu reveals she was once hit by a coconut by a south indian director ssv 92
Next Stories
1 ”मी ‘पनौती’ असल्याचं त्याने इंडस्ट्रीत पसरवलं होतं”; तापसीने सांगितला धक्कादायक अनुभव
2 Photo : ‘या’ फोटोमुळे डायनाला केलं बॉलिवूड कलाकारांनी ट्रोल
3 मुंबईतील पहिले जुळे चित्रपटगृह जमीनदोस्त होणार
Just Now!
X