कोणताही गॉडफादर नसताना केवळ अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे तापसी पन्नू. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्या तापसीने अभिनय कौशल्यामुळे बॉलिवूडमध्ये एण्ट्रीतर मिळवली. त्याचबरोबर मोठा चाहता वर्ग देखील निर्माण केला आहे. अभिनयासोबतच तापसी तिच्या सडेतोड व्यक्तव्यासाठी देखील ओळखली जाते. नुकताच तापसीने एका शोमध्ये कलाविश्वातील पुरुषप्रधान संस्कृतीबद्दल वक्तव्य केले आहे.

काही दिवसांपूर्वी तापसीचा ‘बदला’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला होता. या चित्रपटात तापसीसह बॉलिवूडचे शेहेनशाह अमिताभ बच्चन यांनी भूमिका साकारली होती. तापसीने चित्रपटात बिग बींपेक्षा जास्त सीन्स दिले आहेत. तरी देखील चित्रपटाचे संपूर्ण श्रेय बिग बींना दिल्यामुळे तापसीने खंत व्यक्त केली आहे.

आणखी वाचा : ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर

नुकताच तापसीने नेही धूपियाच्या शोमध्ये हजेरी लावली. दरम्यान तिने ‘मी “बदला” चित्रपटात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा जास्त सीन दिले आहेत. त्यांच्या पेक्षा जास्त मी काम केले आहे. त्यांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती आणि मी खलनायिकेची भूमिका वठवली होती. पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अमिताभ यांचा चित्रपट म्हणून सगळे बोलू लागले’ असे म्हणत तापसीने खंत व्यक्त केली आहे.

आणखी वाचा : ‘हे’ सहाय्यक कलाकार आहेत महागडे, घेतात भरघोस मानधन

‘मी या मुद्द्यावर बोट ठेवले तर लोकांनी माझ्यावर निशाणा साधला. कारण हे कलाविश्व पुरुषप्रधान आहे. बदला चित्रपट अमिताभ यांच्या नावाने ओळखला गेला. त्यामुळे चित्रपटाचे संपूर्ण श्रेय देखील त्यांना देण्यात आले’ असे म्हणत कलाविश्वात पुरुषप्रधान संस्कृती असल्याचे म्हटले आहे.