26 August 2019

News Flash

नागपूर हत्याकांडावरुन तापसीचा ‘कबीर सिंग’च्या दिग्दर्शकावर निशाणा?

चारित्र्याच्या संशयावरुन नागपूरमध्ये एका तरुणाने आपल्या प्रेयसीची हत्या केली होती

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आजकाल सोशल मीडियावर सतत सक्रिय असल्याचे पाहाला मिळते. ती समाजातील प्रत्येक घटेनवर बिनधास्तपणे आपले मत मांडताना दिसते आणि अनेक वेळा ट्रोलही होते. नुकताच ‘कबीर सिंग’ चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांना टोमणा मारत तापसीने एक ट्विट केले होते. त्या ट्विटवरुन नेटकऱ्यांनी तापसीला ट्रोल केले आहे.

काही दिवसांपूर्वी चारित्र्याच्या संशयावरुन नागपूरमध्ये एका तरुणाने आपल्या १९ वर्षीय प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. त्यावर तापसीने एक ट्विट केले होते. बहुतेक ते ऐकमेकांच्या प्रेमात असणार आणि हे प्रेम सिद्ध करण्यासाठी हे कृत्य केले असणार असे तापसीने ट्विटमध्ये लिहिले होते. तापसीने हे ट्विट कबीर सिंगचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांना अप्रत्यक्षपणे टोमणा मारण्यासाठी केल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान तापसी तिच्या या ट्विटमुळे ट्रोल झाली आहे. ‘असे ट्विट करताना तापसीला लाज वाटायला हवी होती’ असे म्हणत नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.