25 January 2021

News Flash

हेल्मेट न घातल्यामुळे तापसीला भरावा लागला दंड

विना हेल्मेट बाईक चालवणं पडलं महागात

तापसी पन्नू

आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री तापसी पन्नू लवकरच ‘रश्मी रॉकेट’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तापसी या चित्रपटातील भूमिकेसाठी तयारी करतेय. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान विना हेल्मेट बाईक चालवताना तापसीला दंड भरावा लागला. त्याचा फोटो तापसीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

बाईक चालवतानाचा पाठमोरा फोटो तापसीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, ‘विना हेल्मेटसाठी दंड भरण्यापूर्वीचा फोटो’. आकाश खुराना दिग्दर्शित ‘रश्मी रॉकेट’ या चित्रपटात तापसी एका धावपटूची भूमिका साकारत आहे. या शूटिंगदरम्यानचे काही फोटो तापसी सोशल मीडियावर शेअर करतेय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

आणखी वाचा : जय बच्चन यांचे ते शब्द ऐकून ऐश्वर्याच्या डोळ्यात आलं पाणी; पाहा व्हिडीओ

या भूमिकेसाठी तापसी खूप मेहनत घेत असून सेटवरही तिच्यासोबत पाच आहारतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, ट्रॅक ट्रेनर, अॅथलेटिक्स कोच आणि जिम ट्रेनर अशी टीम असते. आपल्या जिद्दीच्या व मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचणाऱ्या एका धावपटूची भूमिका ती साकारतेय.

तापसीच्या हातात सध्या बरेच प्रोजेक्ट्स असून नुकतंच तिने आनंद एल राय दिग्दर्शित ‘हसीन दिलरुबा’ या रोमॅण्टिक थ्रिलर चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं. त्यानंतर ती ‘लूप लपेटा’, ‘रन लोला रन’ या चित्रपटांमध्येही झळकणार आहे. अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘थप्पड’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं प्रेक्षक-समीक्षकांकडून कौतुक झालं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2020 1:24 pm

Web Title: taapsee pannu was fined for no helmet on the set of rashmi rocket ssv 92
Next Stories
1 Video : टॉम अँड जेरीचं दमदार पुनरागमन; ट्रेलर पाहून आठवेल बालपण
2 जया बच्चन यांचे ‘ते’ शब्द ऐकून ऐश्वर्याच्या डोळ्यात आलं पाणी; पाहा व्हिडीओ
3 ‘आम्ही संपूर्ण आयुष्य मशिदीमध्ये घालवू पण…’, शाकिबच्या काली पूजा प्रकरणावर कंगनाचं ट्विट
Just Now!
X