29 November 2020

News Flash

‘तारक मेहता…’मधील अभिनेत्रीला करोनाची लागण

सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती..

सब टीव्हीवरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ या मालिकेत रिटा रिपोर्टरची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया अहुजा राजदाला करोनाची लागण झाली आहे. ती गेल्या काही दिवसांपासून मालिकेपासून होती. पण आता तिने करोना झाल्याचे सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितलं आहे.

प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. ‘माझी करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे हे तुम्हाला सांगणं माझं कर्तव्य आहे. मला करोनाची कोणतीही लक्षणे जाणवली नाहीत. डॉक्टरांनी सांगितलेली मी सर्व काळजी घेत आहे. मी सध्या होम क्वारंटाइन आहे. गेल्या तीन चार दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी करोना चाचणी करुन घ्या. स्वत:ची काळजी घ्या आणि घराबाहेर पडताना मास्क लावायला विसरु नका’ असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.

प्रियाची ही पोस्ट पाहता मालिकेतील जेठालाला (दिलीप जोशी), गोगी समय शाह, सोनू झील मेहता यांनी ती लवकरात बरी व्हावी म्हणून प्रार्थना केली आहे. तू लवकरच बरी होशील, काळजी घे असे म्हणत त्यांनी प्रियाच्या पोस्टवर कमेंट केली आहे.

प्रियाने गुजराती दिग्दर्शक मालव राजदा याच्यासोबत लग्न केलं आहे. मालव राजदा हे ‘तारक मेहता उल्टा चष्मा’चे चीफ डायरेक्टर आहेत. या कार्यक्रमाच्या सेटवर प्रिया आणि मालवची ओळख झाली. या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं आणि नंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2020 11:27 am

Web Title: taarak mehta ka ooltah chashmah actor priya ahuja tests positive for covid 19 avb 95
Next Stories
1 ‘तिच्या शेवटच्या आठवणी…’; सामूहिक बलात्काराच्या घटनेवर अर्जुन रामपाल व्यक्त
2 “व्यक्त न होणारे नैतिकदृष्ट्या आजारी”; सामूहिक बलात्काराच्या घटनेवर फराह खान संतापली
3 जुही चावलाला ऑनस्क्रीन रोमान्स करताना पाहून मुलाने दिली ‘ही’ प्रतिक्रिया
Just Now!
X