News Flash

‘टप्पू’ आणि ‘जेठालाल’मध्ये झाले भांडण? राज अनादकतनी केला खुलासा

मालिकेत या बाप-लेकाची जोडी हिट असली तरी खऱ्या आयुष्यात त्यांच्यात वाद सुरु झाल्याचे म्हटले जात होते.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकार हा चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून जेठालाल आणि टप्पूमध्ये भांडण झाल्याचे म्हटले जात होते. पण आता टप्पूने यावर वक्तव्य केले आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत जेठालाल ही मुख्य भूमिका अभिनेते दिलीप जोशी साकारत असून त्यांच्या मुलाची म्हणजेच टप्पूची भूमिका अभिनेता राज अनादकत साकारात आहे. मालिकेत या बाप लेकाची जोडी हिट असली तरी खऱ्या आयुष्यात मात्र त्यांचे नातं फार चांगलं नसल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्या दोघांमध्ये वाद झाल्याचे म्हटले जात होते.

आणखी वाचा : सोनू सूदच्या दुधवाल्यालाही येतायत मदतीसाठी हजारो फोन्स; हा व्हिडीओ एकदा पाहाच 

 

View this post on Instagram

 

A post shared by Dilip Joshi (@maakasamdilipjoshi)

राज अनादकतने नुकताच स्पॉटबॉयला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने या सर्व अफवा असल्याचे सांगितले. ‘मी अशा अफवांकडे लक्ष देत नाही. मी हसून त्याकडे दुर्लक्ष करतो. आमच्यामध्ये भांडण वैगरे झालेले नाही. पण अशा अफवा कोण पसरवतं मला कळत नाही’ असे राज म्हणाला होता.

पुढे तो म्हणाला, ‘मी फक्त प्रेक्षकांना माझे काम कसे आवडेल याकडे लक्ष देतो. लोकं तर अशा अफवा सतत पसरवत असतात. मी अजीबात याकडे लक्ष देत नाही.’ गेल्या काही दिवसांपासून जेठालाल आणि टप्पूमध्ये वाद सुरु असल्याच्या चर्चांना राजने पूर्ण विराम दिला आहे. आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2021 11:35 am

Web Title: taarak mehta ka ooltah chashmah actor raj anadkat aka tappu break silence on tiff with dilip joshi avb 95
Next Stories
1 “तिने माझे मानसिक आणि शारिरीक शोषण केले…”, शिवम पाटीलने अभिनेत्रीवर केला आरोप
2 ‘ये रिश्ता क्या कहलता है’ फेम अभिनेता करण मेहराला अटक, पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई
3 अभिनेता जॅकी भगनानीसह सिनेसृष्टीतील ९ जणांवर बलात्कार आणि विनयभंगाचा मॉडेलचा आरोप
Just Now!
X