छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ ही मालिका गेली १३ वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र हे कायम चर्चेत असते. या मालिकेत टप्पूची भूमिका अभिनेता भव्य गांधीने साकारली होती. पण त्याने मालिका सोडताच त्याला शोमधून निर्मात्यांनी काढून टाकले अशा चर्चा सुरु होत्या. आता भव्यने यावर वक्तव्य करत चर्चांना पूर्णविराम लावला आहे.
जेठालाल आणि दयाबेनचा मुलगा टप्पू हा कायम चर्चेत असतो. टप्पूची भूमिका भव्य गांधीने साकारली होती. पण भव्यने मालिका सोडताच निर्मात्यांनी भव्यचे सेटवरील वागणे पाहून त्याला शोमधून टाकले असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण भव्यला याबाबत मुलाखतीमध्ये विचारण्यात आल्यावर त्याने नकार दिला आणि या सर्व अफवा असल्याचे म्हटले.
आणखी वाचा : आठ वर्षे टप्पूची भूमिका साकारणारा भव्य आहे पत्रकार, जाणून घ्या सध्या काय करतो
View this post on Instagram
भव्यने सांगितले की मला मालिकेतून काढण्यात आले नव्हते. मला कोण काय बोलतं याने फरक पडत नाही. मला ज्या गोष्टी आवडतात त्या मी करतो. मला सत्य माहिती आहे. लोकांना जो विचार करायचा आहे तो करु द्या. माझ्यावर त्या गोष्टींचा परिणाम होत नाही. आजही लोकं मला टप्पू या नावाने आवाज देतात.
आणखी वाचा: ‘तारक मेहता…’मधील जेठालालापासून ते बबितापर्यंत जाणून घ्या कलाकारांची एकूण संपत्ती
भव्य गांधीने आठ वर्षे टप्पू हे पात्र तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत साकारले होते. त्यानंतर त्याने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. सध्या तो गुजराती चित्रपटांमध्ये काम करताना दिसत आहे. पण आजही तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील कलाकारांना तो मिस करत असल्याचे त्याने पुढे सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 15, 2021 5:43 pm