छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. या मालिकेच्या शूटिंगला अखेर सुरुवात झाली असून २२ जुलैपासून प्रेक्षकांना नवीन एपिसोड्स पाहायला मिळतील. सरकारने आखून दिलेल्या नियमांचं पालन करत शूटिंगला सुरुवात झाली. हा शूटिंगचा नवीन अनुभव कसा आहे, याबद्दल जेठालालची भूमिका साकारणारा अभिनेता दिलीप जोशी याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

“शूटिंगची संपूर्ण प्रक्रियाच आम्ही बदलली, कारण आता सेटवर मोजक्याच लोकांना परवानगी आहे. सॅनिटाइज वापरणं, मास्क घालणं हे सर्व नियम पाळले जात आहेत. पण लॉकडाउननंतर सुरू झालेल्या या शूटिंगमध्ये असं वाटलं की आम्ही जणू हॉस्पीटलमध्येच शूटिंग करत आहोत. सर्व ठिकाणी सॅनिटाइजचा वास, लोकं मास्क घालून फिरत आहेत. या वातावरणात कॉमेडी कशी करायची हाच प्रश्न पडला होता. पण आता हळूहळू त्याचीही सवय होईल”, असं दिलीप जोशी म्हणाला.

Using Plastic Chopping Board Can Harm Stomach Throw These Four Items From Kitchen
Earth Day: तुमच्या किचनमधून आजच बाहेर काढा ‘या’ ४ वस्तू; पर्यावरणच नव्हे तर पोटाच्याही ठरतात शत्रू
upsc student surprised father with upsc 2023 result in his office then what happened you will get cry watch viral video
या आनंदाला तोड नाही! UPSC निकालानंतर वडिलांच्या ऑफिसमध्ये पोहोचला लेक अन्…; VIDEO पाहून पाणावतील तुमचेही डोळे
bear and tiger viral video loksatta
Video: अस्वलाचे वाघाला आव्हान! ताडोबाच्या जंगलातील थरार
Garbage picker to video journalist Maya Khodve Journey
कचरा वेचक ते व्हिडिओ जर्नलिस्ट! माया खोडवे यांच्या जिद्दीचा प्रवास

आणखी वाचा : ‘थप्पड’चे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांचा बॉलिवूडला रामराम

‘तारक मेहता..’च्या सेटवर सर्व नियमांचं पालन होत असल्याची माहिती मालिकेते निर्माते असित मोदी यांनी दिली. आता लवकरच प्रेक्षकांना या मालिकेचे नवीन एपिसोड्स पाहता येणार आहेत.