02 December 2020

News Flash

‘तारक मेहता…’मध्ये इतकी सुंदर पत्नी असणारे अय्यर खऱ्या आयुष्यात सिंगल

लवकरच करणार लग्न

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील अय्यर हे पात्र साकारणारे तनुज महाशब्दे कायम चर्चेत असतात. मालिकेतील अय्यर आणि त्यांची पत्नी बबिता, जेठालाल यांच्यामधील केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडत असल्याचे पाहायला मिळते. पण खऱ्याखुऱ्या आयुष्यात त्यांनी अद्याप लग्न केलेले नाही. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी लग्नाबाबत खुलासा केला आहे. दरम्यान त्यांनी मालिकेतील बबिता म्हणजे मुनमुन दत्तासोबत असलेल्या बाँडिंगवर देखील वक्तव्य केले आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये अय्यर यांच्या लग्नाबाबत उत्सुकता वाढली आहे.

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये तनुजने पुढच्या वर्षी लग्नबंधनात अडकणार असल्याचे सांगितले आहे. पण ते कोणाशी लग्न करणार आहेत या बाबत त्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. मालिकेतील बबिता आणि अय्यर ही जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते. पण खऱ्या आयुष्यात मालिकेचे चित्रीकरण संपल्यानंतर त्या दोघांचे बोलणेही होत नसल्याचे तनुज यांनी सांगितले आहे.

आणखी वाचा- ‘प्यार हुआ इक़रार हुआ…’; टप्पूच्या स्वॅगवर बबिता झाली फिदा

दरम्यान तनुज यांनी दयाबेनची पुन्हा एण्ट्री होणार का? यावर वक्तव्य केले आहे. ‘दिशाची मुलगी अजून लहान आहे आणि सध्या करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये थोडी भीती वाटतेच. त्यामुळे मालिकेत ती लवकर दिसणार नाही. मालिकेची संपूर्ण टीम दिशाला मिस करते आहे. तिची जागा कोणीही घेऊ शकत नाही. ती जेव्हा कधी शोमध्ये पुन्हा दिसेल आम्ही सर्वजण आनंदी असणार’ असे तनुज यांनी म्हटले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 12:24 pm

Web Title: taarak mehta ka ooltah chashmah iyer said that he is going to marry soon avb 95
Next Stories
1 Video : महेश कोठारे -आदिनाथ पुन्हा एकत्र झळकणार?
2 ‘या शेफशी पंगा घेऊ नका, अन्यथा…’; पाहा वाऱ्याच्या वेगाने नानचक चालवणारा कुगफू शेफ
3 ‘प्यार हुआ इक़रार हुआ…’; टप्पूच्या स्वॅगवर बबिता झाली फिदा
Just Now!
X