छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ या मालिकेतील जेठालाल, बबिता, बाबूजी, पोपटलाल, अय्यर, भिडे ही सर्व पात्रे कायम चर्चेत असतात. पण सर्वात जास्त चर्चा सुरु असतात त्या जेठालालची भूमिका साकारणारे दिलीप जोशी यांच्या. नुकाताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये दिलीप यांनी मालिकेती एक डायलॉग वादाच्या भोवऱ्यात अडकला असल्याचे सांगितले होते.

स्टँड अप कॉमेडियन सौरभ पंतबरोबर एका पॉडकास्टमध्ये दिलीप जोशी यांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील त्यांच्या भूमिकेविषयी सांगितले. दरम्यान त्यांनी मालिकेतील त्यांचा एक डायलॉग वादाच्या भोवऱ्यात अडकला असल्याचे सांगितले आहे.

एकदा जेठालाल यांनी मालिकेतील एका डायलॉगमध्ये सुधारणा केली होती. त्यांनी दयाबेनला ‘पागल औरत’ असे म्हटले होते. या त्यांच्या डायलॉगवरुन त्यावेळी प्रचंड चर्चा सुरु झाल्या होत्या. अनेक मीम्स तयार झाले होते. पण हा डायलॉग वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.

‘मालिकेतील पागल औरत असा एक डायलॉग होता तो मी स्वत: सुधारणाकरुन तयार केला होता. सेटवर अशी काही परिस्थिती निर्माण झाली होती की माझ्या तोंडून ए पागल औरत असे पटकन निघाले. ज्याचा अर्थ असा होतो की तू काहीही बोलते आहेस. मात्र Women Liberation Movement यांनी त्यावर अक्षेप घेतला होता आणि पुन्हा हा डायलॉग वापरु नये असे मला सांगितले’ असे दिलीप म्हणाले.

या डायलॉगचा चुकीचा अर्थ काढण्यात येत आहे त्यामुळे हा डायलॉग पुन्हा मालिकेत वापरु नये असे मला सांगण्यात आले. ‘या डायलॉगमुळे कोणालाही कमी लेखण्यात आले नव्हते पण काही लोकांना ते आवडले नाही’ असे त्यांनी पुढे म्हटले.