छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आता मालिकेती नट्टू काका हे पात्र साकारणारे अभिनेते घनश्याम नायक हे कर्करोगाशी झुंज देत आहेत. घनश्याम यांचा मुलगा विकासने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये याबाबत खुलासा केला आहे.

तिन महिन्यांपूर्वी घनश्याम यांच्यावर उपचार सुरु होते. तेव्हा त्यांची प्रकृती ठीक होती. पण आता डॉक्टर पुन्हा त्यांच्यावर उपचार करत असल्याचे त्यांच्या मुलाने सांगितले आहे. सप्टेंबर २०२०मध्ये ७७ वर्षीय घनश्याम यांना कर्करोग झाल्याचे कळाले होते. त्यानंतर त्यांची सर्जरी झाली होती.

आणखी वाचा : ‘हे माँ माताजी!’, नव्या दयाबेनचा शोध थांबला? हा व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा

घनश्याम यांचा मुलगा विकासने दिलेल्या माहितीनुसार, घनश्याम यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. पण आम्हाला कोणती रिस्क घ्यायची नाही. म्हणून आम्ही त्यांची केमोथेरपी सुरु केली आहे. घनश्याम यांच्यावर आधी उपचार केलेले डॉक्टरच पुन्हा उपचार करती आहे. तसेच त्यांना त्याच रुग्णालयात दाखल केले आहे.

गेल्या आठवड्यात घनश्याम हे गुजरातमधील दमण येथे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेच्या चित्रीकरणासाठी गेले होते. बऱ्याच दिवसांनंतर चित्रीकरण करतानाचा अनुभव सांगते ते म्हणाले होते की, ‘माझी प्रकृती ठीक आहे पण ट्रीटमेंट पुन्हा सुरु केली आहे. सध्या केमोथेरपी सुरु आहे. चार महिन्यांतर मी एक खास सीन शूट केला आणि पुन्हा चित्रीकरण करताना मला प्रचंड आनंद झाला होता.’