News Flash

‘मालिका ही एका कलाकाराची नाही’, दयाबेनच्या वापसीवर अंजली भाभी म्हणाली

'तारक महेता...'मधील दयाबेनच्या वापसीवर अंजली भाभीने सोडले मौन

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ या मालिकेतील जेठालाल, दयाबेन, बबीता, चंपकलाला, मिसेस हाती ही सगळीच पात्र कायम चर्चेत असतात. पण दयाबेन हे पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी २०१७पासून मालिकेपासून लांब आहे. तिची मुलगी लहान असल्यामुळे तिने ब्रेक घेतला आहे. तिला पुन्हा मालिकेत पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. पण आता मालिकेत दयाबेनची भूमिका एक नवी अभिनेत्री साकारणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याबाबत मालिकेतील अंजली भाभीने वक्तव्य केले आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत अंजली भाभी हे पात्र सुनैना फौजदार साकारत आहे. तिने नुकताच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिशा वकानी मालिकेत पुन्हा दिसणार की नाही याबाबत वक्तव्य केले आहे. ‘ही मालिका सर्वांची आहे. एका कलाकाराची नाही. या मालिकेची कथा एका कलाकाराभोवती फिरत नाही आणि हिच या मालिकेची खास गोष्ट आहे. जर एखादे पात्र हे प्रेक्षकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे तर त्याचा अर्थ मालिका चांगली चालत आहे’ असे सुनैना म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunayana Fozdar (@sunayanaf)

आणखी वाचा: ‘तारक मेहता…’मध्ये दयाबेनच्या भूमिकेत दिसणार ही अभिनेत्री?

पुढे ती म्हणाली, ‘मालिकेतील प्रत्येकजण १०० टक्के देऊन काम करत असतो. केवळ एका व्यक्तीला त्याचे श्रेय जात नाही. या मालिकेत कोणी एक मुख्य भूमिकेत नाही. दया बेनची मालिकेत कधी एण्ट्री होणार हे असित मोदीच सांगू शकतात. कारण आम्हाला देखील माहिती नाही. आम्ही देखील याबाबत त्यांना बऱ्याच वेळा विचारतो. पण कोणाला याबाबत काही माहिती नाही.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2021 1:05 pm

Web Title: taarak mehta ka ooltah chashmah sunayana fozdar aka anjali bhabhi speaks on disha vakani come back avb 95
Next Stories
1 अनुष्काने शेअर केला खास फोटो, वामिकासोबत अनुष्का पोहचली ‘या’ ठिकाणी
2 …..म्हणून आमिरने लावला ‘महाभारत’ला ब्रेक!
3 ‘फिल्मफेअरची ही ब्लॅक लेडी पुन्हा एकदा हातात’- महेश कोठारे
Just Now!
X