‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतील बबिता उर्फ अभिनेत्री मुनमुन दत्ता सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. मुनमुनने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो पोस्ट केले होते. या फोटोंवरुन टप्पू उर्फ अभिनेता राज अनादकटने तिची खिल्ली उडवली आहे. तारक मेहतामधील या दोन कलाकारांची अनोखी जुगलबंदी सोशल मीडियावर रंगली आहे.
अवश्य पाहा – नेहा कक्करची सुशांतला संगीतमय श्रद्धांजली; व्हिडिओला ७० लाखांहून अधिक व्ह्यूज
View this post on Instagram
अवश्य पाहा – ‘इश्कबाज’ अभिनेत्रीला करोनाची लागण; तोंडाची चव गेल्यानंतर शंका आल्याने केली टेस्ट
काय म्हणाला टप्पू?
मुनमुनने लाल रंगाच्या ड्रेसमधील काही फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले. या फोटोंमध्ये तिच्या हातात चहाचा कप दिसत आहे. “हा कप रिकामा आहे” अशी गंमतीशीर कॉमेंट या फोटोखाली राजने केली. यावर मुनमुन म्हणाली, “तुला कसं माहिती?” तिच्या या कॉमेंटवर “मी देखील असेच फोटो काढतो.” अशी प्रतिक्रिया राजने दिली. त्यांची ही अनोखी जुगलबंदी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. गोकूलधाम नावाच्या एका सोसायटीमध्ये घडणाऱ्या गंमती जंमती या मालिकेमध्ये दाखवल्या जातात. लॉकडाउनच्या काळातही या विनोदी मालिकेची लोकप्रियता बिलकूल कमी झालेली नाही. किंबहूना TRPच्या बाबतीत ‘रामायण’, ‘महाभारत’ या मालिकेशी तारक मेहता स्पर्धा करताना दिसत आहे.