छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय मालिका म्हणून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेकडे पाहिले जाते. गेली १० ते १२ वर्षे ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तसेच मालिकेधील जेठालालच्या दुकानात काम करणारे नट्टू काका हे पात्र देखील प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरत असल्याचे दिसत आहे. नट्टू काकाने स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनेते घनश्याम नायक यांनी नट्टू काका ही भूमिका साकारली आहे. पण आता नट्टू काका मालिकेत दिसणार नसल्याचे म्हटले जात आहे. यासंदर्भात बोलताना नट्टू काकां यांनी करिअरची सुरुवात कुठून झाली हे सांगितले आहे.

लॉकडमुळे अनेक मालिका आणि चित्रपटांचे चित्रीकरण थांबवण्यात आले होते. पण आता सरकारने चित्रीकरणार परवानगी दिली आहे. पण त्यासाठी काही नियम आखण्यात आले आहेत. या नियमांअंतर्गत ६५ वर्षांहून अधिक वय असलेल्या कलाकारांना शूटींगला जाण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे आता नट्टू काका मालिकेत दिसणार नसल्याच्या जोरदार चर्चा चाहत्यांमध्ये रंगल्या होत्या.

आणखी वाचा : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील कलाकारांचे एका भागाचे मानधन माहित आहे का?

नुकताच या संदर्भात घनश्याम नायक यांनी स्पॉटबॉयला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी आजवर ३०० हून अधिक मालिका आणि १०० पेक्षाजास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘मी आजपर्यंत हिंदी आणि गुजरातीमध्ये ३५० पेक्षा जास्त मालिकांमध्ये काम केले आणि जवळपास २५० चित्रपटांमध्ये काम केले आहे, सध्या लॉकडाउनमध्ये मी माझे जुने काम पुन्हा पाहत आहे’ असे म्हटले आहे.

आणखी वाचा : तारक मेहतामधील ‘या’ कलाकाराला सुरुवातीला ३ रुपयांसाठी करावे लागत होते अनेक तास काम

करिअरच्या सुरुवाती विषयी बोलताना ते म्हणाले, ‘मी १९५९मध्ये शाळेत शिकत असताना बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरची आई हनी इराणीसोबत चित्रपटात काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्या सुद्धा त्यावेळी बालकलाकार होत्या. त्या चार वर्षांच्या होत्या आणि नानी तेरी मोरनी को मोर ले गया हे लोकप्रिय गाणे गायले. आम्ही मालाडमध्ये त्या गाण्याचे शुटींग केले. त्यानंतर मी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे’ असे त्यांनी म्हटले आहे.

‘आता मी ७५ वर्षांचा आहे. मी ६८ वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. पण मला तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील नट्टू काकाने एक वेगळीच ओळख निर्माण करुन दिली’ असे त्यांनी म्हटले आहे.