बी- टाऊनच्या सर्वात लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक तैमुर आहे. तैमुर कुठेही गेला तरी प्रसारमाध्यमं त्याला फॉलो करतातच. अगदी थोड्याच वेळात त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या देशभरात गणेशोत्सवाची धूम आहे. प्रत्येकजण गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यात व्यग्र आहे. यात तैमुर तरी कसा मागे राहिल. मंगळवारी करिना कपूर खान तिच्या आत्याकडे गणपती दर्शनाला गेली होती. तिच्यासोबत तैमुरही आजीकडे गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला गेला होता. यावेळी तैमुरने पांढऱ्या रंगाचा कुर्ता- पायझमा घातला होता. या पारंपरिक लूकमध्ये तैमुर फारच क्युट दिसत होता. रीमा जैनचे दोन्ही मुलं अदार आणि अरमान जैनने तैमुरसोबतचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले. व्हिडिओमध्ये तैमुर फारच मस्तीच्या मूडमध्ये खेळताना दिसत आहे.

सैफ अली खान आणि करिना कपूरचा मुलगा तैमुर आता शाळेत जातो. जेव्हापासून तैमुरने प्ले- स्कूलमध्ये जाणं सुरू केलं, तेव्हापासून दररोज त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले जातात. छोटा नवाब प्रत्येक ड्रेसमध्ये क्युट आणि कूल अंदाजात दिसतो. कोणाचीच नजर तैमुरवरून हटत नाही. तैमुरचा जन्म २० डिसेंबर २०१६ ला मुंबईत झाला. तैमुर त्याच्या जन्मापासूनच लाइमलाइटमध्ये आला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taimur ali khan ganapati celebration 2018 watch this videos
First published on: 19-09-2018 at 19:23 IST