News Flash

PHOTOS: तैमुर अशी साजरी करतोय त्याची पहिली दिवाळी

कुर्ता- पायजमामधील तैमुरचे हे फोटो होत आहेत व्हायरल

तैमुर अली खान

सैफ अली खान आणि करिना कपूरचा मुलगा तैमुरचे स्टारडम हे कोणत्याही सुपरस्टारपेक्षा कमी नाही. तो कुठेही दिसला तरी प्रसारमाध्यमांच्या नजरा त्याच्याकडेच वळतात. त्याच्या प्रत्येक लूकची चर्चा होते. त्याच्या आवडीनिवडीबद्दलही अनेक गोष्टी सोशल मीडियावर लिहिल्या जातात. या दिवाळीतही सध्या सोशल मीडियावर तैमुरचीच चर्चा आहे. तैमुरला आजी बबीताच्या घरी नेतानाचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. कॅमेरांमध्ये टिपल्या गेलेल्या या फोटोंमध्ये चिमुकला तैमुर कुर्ता- पायजमा घातलेला पाहायला मिळतोय. या फोटोंमध्ये तैमुरवरून कोणाचीच नजर हटणार नाही असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

तैमुरची ही पहिलीच दिवाळी असून या फोटोवरही चाहत्यांनी त्याला दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. तैमुर मोठा होऊन सर्वांसाठी स्टाईल आयकॉन बनेल असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. करिना आणि सैफचा हा छोटा नवाब अजून वर्षभराचाही झाला नाही. त्याचे फोटो टिपण्यासाठी नेहमीच फोटोग्राफर्स खूप उत्सुक असतात.

वाचा : ऐन दिवाळीत शाहिदची ‘बत्ती गुल…’

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत करिनाला दिवाळीच्या तयारीबद्दल विचारले असता ती म्हणालेली की, ‘दिवाळीत तैमुरसाठी पारंपरिक कपड्यांचीच खरेदी केली आहे. त्याला मिठाईसुद्धा खूप आवडते.’ येत्या १ डिसेंबर रोजी तैमुर त्याचा पहिला वाढदिवस साजरा करणार आहे. त्याचा वाढदिवस कशाप्रकारे साजरा केला जाईल याविषयीही अनेकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळतेय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2017 6:37 pm

Web Title: taimur ali khan is celebrating his first diwali pictures
Next Stories
1 ३५ वर्षांनंतर कीर्ती कॉलेजने आयएनटीवर कोरले आपले नाव
2 या अभिनेत्याने केले लिंगबदल, आता ओळखूही शकणार नाही
3 ऐन दिवाळीत शाहिदची ‘बत्ती गुल…’
Just Now!
X