20 January 2018

News Flash

तैमुरला ‘हे’ पदार्थ आवडतात

सैफने सांगितल्या तैमुरच्या आवडीनिवडी

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 30, 2017 7:13 PM

सैफ अली खान आणि तैमुर

स्टारकिड म्हटलं की करिना कपूर-खान आणि सैफ अली खानच्या चिमुकल्या तैमुरचं नाव सर्वात आधी घेतलं जातं. तैमुरच्या फोटोपासून त्याच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. सोशल मीडियावर तैमुरचे फोटो क्षणार्धात व्हायरलही होतात. त्याला काय आवडतं? याची माहिती सैफनं नुकत्याच एका मुलाखतीत दिली.

सैफ सध्या त्याच्या आगामी ‘शेफ’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. यावेळी त्यानं तैमुरला कोणते पदार्थ आवडतात, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ‘कुस्करलेला नास्पती फळ आणि गाजर त्याला खूप आवडतं. सुरुवातीला आम्ही त्याला डाळ आणि बटाट्याची चव चाखायला दिली होती. त्यावेळी त्याचा चेहरा स्पष्ट सांगत होता की, याची चव तेवढी वाईट नाही,’ असं त्यानं सांगितलं.

💕💕

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

#lookatme 👀👶

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

वाचा : ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार हे दमदार चित्रपट

सध्याचं वेळापत्रक व्यग्र असल्यानं तैमुरला जास्त वेळ देता येत नाही, अशी खंतही त्यानं व्यक्त केली. ‘जर मी ही मुलाखत आटोपून त्याला भेटलो नाही, तर तो अन्नपदार्थ काय मलाही ओळखणार नाही. मी तीन दिवस झाले त्याला भेटलो नाही,’ असंही त्यानं सांगितलं. नोकरी आणि मुलावरील प्रेम यात तारेवरची कसरत कराव्या लागणाऱ्या पित्याची भूमिका तो ‘शेफ’ या चित्रपटात साकारणार आहे. हा चित्रपट जॉन फेव्हर्यूने याच्या ‘शेफ’ या हॉलिवूड चित्रपटाचा अधिकृत रिमेक असून येत्या ६ ऑक्टोबरला तो प्रदर्शित होईल. या चित्रपटातून अभिनेत्री पद्मप्रिया जनकिर्मन ही बॉलिवूडमध्ये पुनरागमन करतेय. यात ती सैफच्या पत्नीची भूमिका निभावणार आहे.

First Published on September 30, 2017 7:13 pm

Web Title: taimur ali khans favourite food revealed his father saif ali khan
  1. A
    Ajinkya
    Oct 1, 2017 at 2:07 am
    मनोरंजनविषयक बातमी प्रसिद्ध करण्यात काही वावगं नाही , लोकसत्ता सारख्या मराठी दैनिकाला बरेच महाराष्ट्रातील वाचक दररोज वाचतात, त्यावर कदाचित चर्चा पण करत असतील, पण मोठ्या सेलिब्रिटीची मुले काय खातात, काय पितात , रडताना कशी दिसतात अश्या आशयाच्या बातम्या म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे! यावरून, कळून येते कि पत्रकारितेचे दर्जा दिवसेंदिवस ढासळत आहे. असल्या बातमींपेक्षा बालमजुरी, बालआरोग्य सुविधा, त्यांचे शिक्षण इत्यादी विषयांवर निपक्ष सखोल लेख प्रसिद्ध करवावे. UN रिपोर्ट्स, आंतरराष्ट्रीय पातळीवर असल्या विभागांमध्ये झालेली प्रगती आणि आपल्या देशातील / राज्यातील सध्याची स्तिथी यांचा तुलनात्मक अभ्यासपूर्ण लेख द्यावेत. आपण पण एक सजग नागरिक म्हणून आपल्या देशासमोर असलेले वास्तविक प्रश्नांचा गंभीरतेने विचार करायला हवा!
    Reply