News Flash

VIDEO: अक्षय कुमारचे आलिशान घर पाहिले का?

घरातील प्रत्येक गोष्टीसोबत काही आठवणी जोडल्या गेलेल्या असतात

छाया सौजन्य- फेसबुक/वोग

आपला आवडता कलाकार कोणत्या प्रकारचं आयुष्य जगत असेल? त्या कलाकाराचं राहणीमान कोणत्या प्रकारचं असेल आणि मुख्य म्हणजे त्या कलाकाराचं घर कसं असेल असे अनेक प्रश्न नेहमीच अनेकांना पडत असतात. त्यातही काही ठराविक कलाकारांविषयी प्रेक्षकांच्या मनात नेहमीच कुतुहलाचे वातावरण पाहायला मिळते. त्यापैकीच एक कलाकार म्हणजे अभिनेता अक्षय कुमार. गेल्या कित्येक वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत खिलाडी कुमार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्षय कुमारने आजवर त्याच्या मेहनतीने बॉलिवूडमध्ये स्वत:चे असे स्थान निर्माण केले आहे. अशा या खिलाडी कुमारच्या राहणीमानाविषयी जाणून घेण्यासाठी अनेकांनाच उत्सुकता लागून राहिलेली असते.

याच उत्सुकचेचं वातावरण पाहता अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी एक खास भेट ठरणारा व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘वोग’च्या फेसबुक अकाउंटद्वारे हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून अक्षय कुमारच्या आलिशान घराची झलक या व्हिडिओतून पाहायला मिळत आहे. त्याच्या घरातील प्रत्येक गोष्टीबद्दल सांगताना अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना घराविषयीचे तिचे मनोगत व्यक्त करत आहे. समुद्रकिनारी असलेले अक्षयचे घर पाहता सध्या अनेकांचेच लक्ष त्याकडे जात आहे.

घरामध्ये लावलेल्या चित्रांपासून ते प्रत्येक शोभेच्या वस्तूविषयीही ट्विंकल या व्हिडिओमध्ये सांगत आहे. कोणत्याही प्रकारच्या गडद रंगाचा वापर न करताही अक्षयच्या घरामध्ये काही सौम्य रंगांचा वापर करत घराची शोभा वाढविण्यात आली आहे. तेव्हा ही पाहा अक्षयच्या घराची एक झलक..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2017 4:52 pm

Web Title: take a look of akshay kumars lavish home
Next Stories
1 ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’चे ‘हमसफर’ गाणे मनाला भिडणारे
2 करिष्माचा तथाकथित प्रियकर बनला कपूर कुटुंबाचा सदस्य?
3 कंगनाच्या धमाकेदार एण्ट्रीने ‘रंगून’ गेला 2 MAD चा मंच
Just Now!
X