लॉकडाउनमुळे सर्वसामान्यांसोबतच सेलिब्रिटीसुद्धा घरीच बसले आहेत. सर्व शूटिंग रद्द झाल्यामुळे त्यांना आता कुटुंबीयांसोबत मनसोक्त वेळ घालवण्याची संधी मिळाली आहे. लॉकडाउन जाहीर होताच अभिनेता हृतिक रोशनची घटस्फोटीत पत्नी सुझान खान त्याच्या घरी राहायला आली. रेहान आणि रिधान या दोन मुलांसोबत वेळ घालवता यावा आणि लॉकडाउनमध्ये मुलांची गैरसोय होऊ नये यासाठी सुझानने हा निर्णय घेतला. हृतिक आणि सुझान दोघंही सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. लॉकडाउनच्या काळात ते घरी बसून काय करत आहेत, त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. या फोटोंमध्ये हृतिकच्या आलिशान घराची झलक पाहायला मिळतेय.
इतरांप्रमाणेच सुझानसुद्धा ‘वर्क फ्रॉम होम’ करतेय. त्याचेही फोटो तिने पोस्ट केले आहेत. जवळपास ३००० चौरस फुटांचं हे घर आहे. हृतिकचं चार बीएचकेचं घर नव्याने बांधण्यात आलं असून त्यात फुटबॉल टेबल, बिलिअर्ड्स टेबल, चॉकलेट वेंडिंग मशिनसाठी वेगळी जागा करण्यात आली आहे.
पुस्तकं वाचणं, व्यायाम करणं यांसाठी हृतिक, सुझान व दोन्ही मुलं एकत्र येतात. लॉकडाउनमधला वेळ कंटाळवाणा होऊ नये यासाठी हृतिकने वेळापत्रक तयार केल्याचं सुझानने एका मुलाखतीत सांगितलं होतं. आठवड्यातील पाच दिवस सर्वजण मिळून वाचन करतात, असं तिने सांगितलं. रोज संध्याकाळी सहा वाजता हृतिकसोबत सुझान, रेहान आणि रिधान व्यायाम करतात. लॉकडाउनमध्ये सुझानने घरी येण्याचा योग्य निर्णय घेतल्याचं म्हणत राकेश रोशन यांनीही कौतुक केलं होतं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 28, 2020 10:39 am