काही वर्षांपूर्वी कुस्तीवर आधारित ‘तालीम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने अनेकांची मनं जिंकली होती. त्यामुळे लवकरच आता ‘तालीम २’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लाल मातीत रंगणारा कुस्तीचा डाव पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाल्याचं दिसून येत आहे. त्यातच या चित्रपटाचं टीझर पोस्टर प्रदर्शित झालं आहे.

‘तालीम’ या चित्रपटाचे दिग्दर्शक नितीन रोकडेच ‘तालीम २ ‘चंदेखील दिग्दर्शन करणार आहेत. त्यामुळे या नव्या चित्रपटात पुन्हा एकदा एका विषय हाताळला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं पोस्टर अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. यात भारताचा झेंडा हवेत तरंगताना दिसत आहे.

दरम्यान, या चित्रपटाचं दिग्दर्शन नितीन रोकडे करत आहेत. तर पटकथा लेखन संदिप कुमार रॉय, मधुलिता दास आणि नितीन रोकडे यांनी केलं आहे. सध्या तरी या चित्रपटाती भूमिकांवर आणि यात कोणते कलाकार झळकणार हे अद्यापतरी गुलदस्त्यात आहे.