27 January 2021

News Flash

“लव्ह जिहाद बोलण्यापूर्वी स्पेशल मॅरेज अ‍ॅक्ट पाहा”; जिशान अय्युबच्या पत्नीचं ट्रोलर्सला प्रत्युत्तर

डोहाळे जेवणाचा फोटो पोस्ट करत रसिकाने टीकाकारांना सुनावलं

टाटा ग्रुपच्या ‘तनिष्क’ या दागिण्यांच्या ब्रॅण्डची एक नवी जाहिरात सध्या प्रचंड चर्चेत आहे. या जाहिरातीत दोन वेगळ्या धर्मातील व्यक्तींच्या लग्नासंदर्भात भाष्य करण्यात आलं आहे. मात्र ही जाहिरात काही प्रेक्षकांना आवडली नाही. त्यांनी सोशल मीडियाद्वारे #BoycottTanishq असं म्हणत आपला विरोध दर्शवला. अखेर वाढत्या टीकेमुळे ‘तनिष्कने’ ही जाहिरात मागे घेतली. दरम्यान या प्रकरणावर अभिनेता जिशान अय्युबची पत्नी रसिका अगाशे हिने प्रतिक्रिया दिली आहे. लव्ह जिहाद म्हणणाऱ्यांना स्पेशल मॅरेज अ‍ॅक्ट माहित नाही का? असा सवाल तिने केला आहे.

अवश्य पाहा – ‘रामायणात १४ वर्षांचा वनवास होतो अन् करोनात…’; अभिनेत्रीने मानले BMC चे आभार

रसिकाने आपल्या डोहाळे जेवणाचा एक फोटो ट्विट केला आहे. “माझ्या डोहाळे जेवणाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करावासा वाटला. आणि हा लव्ह जिहादच्या नावाने रडण्यापूर्वी कृपया स्पेशल मॅरेज अ‍ॅक्ट काय आहे? हे देखील जाणून घ्या.” अशा आशयाचं ट्विट करुन तिने टीकाकारांना उपरोधिक टोला लगावला आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – बॉलिवूड अभिनेता देतोय मृत्यूशी झुंज; पूजा भट्टने देशवासीयांना केली मदतीची विनंती

काय होतं तनिष्कच्या जाहिरातीमध्ये?

मुस्लिम कुटुंबामध्ये लग्न करुन गेलेल्या हिंदू तरुणीसाठी तिच्या सासरचे लोकं हिंदू प्रथांप्रमाणे डोहाळे जेवण करण्याचा निर्णय घेतात असं या जाहिरातीत दाखवण्यात आलं आहे. तनिष्कने दिलेल्या माहितीनुसार, आपल्या मुलीप्रमाणे सुनेवर प्रेम करणाऱ्या कुटुंबामध्ये या तरुणीचे लग्न झालं आहे. सामान्यपणे ज्या गोष्टी कुटुंबामध्ये साजऱ्या होत नाहीत त्या गोष्टी केवळ तिच्यासाठी साजरा करण्याचा निर्णय कुटुंब घेतं. दोन वेगळे धर्म, परंपरा आणि संस्कृतीला मेळ या जाहिरातीमध्ये साधण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे असं कंपनीचं म्हणणं आहे. मात्र अनेकांना ही जाहिरात फारशी आवडलेली नाही. या जाहिरातीमधून लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2020 11:43 am

Web Title: tanishq add rasika agashe zeeshan ayyub love jihad mppg 94
Next Stories
1 ‘आज बाळासाहेब असते, तर मुंबईत अशा घटना घडल्याच नसत्या’; मुकेश खन्नांनी शेअर केला व्हिडीओ
2 मॅट्रिमोनिअल वेबसाईटवरून झाली ओळख; जोडीदाराबद्दल व्यक्त झाली सई लोकूर
3 “मी त्याचा पराभव करेन”; कॅन्सरविषयी बोलतानाचा संजय दत्तचा व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X