News Flash

#MeToo : तनुश्रीला फोटोशूट करणं पडलं महागात

तनुश्रीने नानांवर आरोप केल्यानंतर अनेकांनी तिची पाठराखण केली होती.

तनुश्री दत्ता

अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केल्यानंतर बॉलिवूडमध्ये #MeTooचे वारे वाहत आहेत. त्यामुळे सध्या बॉलिवूडमध्ये हे प्रकरण चांगलचं गाजत असल्याचं दिसून येत आहे. तनुश्रीने नानांवर आरोप केल्यानंतर अनेकांनी तिची पाठराखण केल्याचं पाहायला मिळालं. मात्र आता एका फोटोशूटमुळे तनुश्रीवर ट्रोल होण्याची वेळ आली आहे.

काही दिवसापूर्वी तनुश्रीने एक फोटोशूट केलं होतं. यातील काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. यात तिने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला असून ती एका वेगळ्या आणि नव्या अंदाजात दिसून येत आहे. परंतु तनुश्रीचं हे फोटोशूट मात्र चाहत्यांच्या पसंतीत न पडल्याचं दिसून आलं आहे. अनेकांनी तिच्यावर टीका केली असून ती हे सारं पब्लिक स्टंटसाठी करत असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

‘तनुश्री तू नानांवर गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. त्यामुळे सध्या याविषयी जोरदार चर्चा रंगली आहे. खरंतर तू या मुद्द्याकडे गांभीर्याने बघायला हवं. पण तुझ्याकडे पाहून असं अजिबात वाटत नाहीये. जर नाना खरंच असं वागले असते तर आज तू असं फोटोशूट करत बसली नसतीस. याउटल तू चिंताग्रस्त असायलं हवं होतं’, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

तर एका युजरने, ‘सध्या तुझ्याकडे एकही चित्रपट नाही. याकारणामुळेच तू नाना पाटेकरांना बदनाम करण्यासाठी आणि प्रसिद्धी मिळविण्यासाठीच #metoo चं नाटक करत आहे’, असं म्हटलं आहे.

दरम्यान, २००८ मध्ये हॉर्न ओके प्लीज चित्रपटाच्या सेटवर नानांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्रीने केला. यानंतर नाना-तनुश्री वाद चांगलाच रंगला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2018 1:01 pm

Web Title: tanushree dutta got trolled on photograph she shared on social media
टॅग : MeToo
Next Stories
1 #MeToo : उद्या मोदींवरही आरोप होतील- शक्ती कपूर
2 #MeToo : मत तयार करण्याआधी त्या महिलांचं ऐकून घ्या- रितेश देशमुख
3 #MeToo : आता विकी कौशलचे वडीलही आरोपीच्या पिंजऱ्यात
Just Now!
X