News Flash

2 States : मराठी अभिनेत्रीने बांधली मल्याळम अभिनेत्याशी लग्नगाठ

महाराष्ट्रीयन आणि दाक्षिणात्य अशा दोन्ही पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पडला.

काही दिवसांपूर्वी पार पडला लग्नसोहळा

‘जावई विकत घेणे आहे’ ही मालिका छोट्या पडद्यावर चांगलीच गाजली होती. या मालिकेत तन्वी पालव आणि निरंजन कुलकर्णी मुख्य भूमिकेत होते. मालिकेत प्रांजलची भूमिका साकारणारी तन्वी लग्नबंधनात अडकली असून मल्याळम अभिनेत्याशी तिने लग्नगाठ बांधली आहे. मल्याळम अभिनेता सिद्धार्थ मेनन आणि तन्वीने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत.

तन्वी आणि सिद्धार्थ गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. तन्वी महाराष्ट्राची तर सिद्धार्थ केरळचा असल्याने चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छा देताना ‘२ स्टेट्स’ असं म्हटलंय. ‘२ स्टेट्स’ हा आलिया भट्ट आणि अर्जुन कपूरचा गाजलेला चित्रपट. यामध्ये नायक पंजाबी तर नायिका तामिळ असते. या दोघांची प्रेमकहाणी आणि लग्न याबाबत चित्रपटाची कथा आहे.

सिद्धार्थ-तन्वी महाराष्ट्रीयन तसेच दाक्षिणात्य पद्धतीनुसार विवाहबद्ध झाले. लग्नानंतर रिसेप्शनसाठी तन्वीने साऊथ इंडियन सिल्क साडी परिधान केली होती. तर सिद्धार्थने काळ्या रंगाचा सफारी सूट परिधान केला होता. आयुष्याच्या या नव्या प्रवासासाठी दोघांनाही चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2020 12:33 pm

Web Title: tanvi palav and malayalam actor siddharth menon tie the knot ssv 92
Next Stories
1 तारा सुतारियाच्या घरी वाजणार सनई-चौघडे; करीना होणार नणंदबाई?
2 Video : सेलिब्रिटी झाल्यानंतर रिंकूला वाटते ‘या’ गोष्टीची खंत
3 माझ्यामुळे ‘डर’मध्ये शाहरुख खान दिसला -राहुल रॉय
Just Now!
X