“एका सावलीपासून सुरु झालेला रंग्याचा प्रवास आज पुरस्काराच्या बाहुलीपर्यंत पोहोचला आहे,” या शब्दांत ‘टपाल’चे दिग्दर्शक लक्ष्म उतेकर यांनी राज्य पुरस्कार वितरणानंतर बालकलाकार रोहित उतेकरचं कौतुक केलं. ५१व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात ‘टपाल’ चित्रपटातील बालकलाकार रोहित उतेकरला सुप्रसिद्ध अभिनेते अरुण नलावडे यांच्या हस्ते उत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार, तर ‘दोन दिसांची सावली’ या गाण्यासाठी गीतकार आणि कवी प्रकाश होळकर यांनी अभिनेता दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते उत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

विजयपताका फडकावण्याची ‘टपाल’ची ही पहिलीच वेळ नसून, प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने एकूण नऊ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत गौरव प्राप्त केला आहे. इफ्फी (इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल ऑफ इंडिया)च्या इंडियन पॅनोरमा विभागातही या चित्रपटाची निवड झाली होती. तसेच, मुंबईत भरलेल्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टीव्हल आणि पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलमध्येही या चित्रपटाची निवड झाली होती. ‘टपाल’मधील तुळसाच्या भूमिकेसाठी अभिनेत्री वीणा जामकरला दक्षिण आफ्रिकेत मिळालेला इफ्फाचा पुरस्कार हा अभिनयक्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो. या विजयी घोडदौडीत आता महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराची मोलाची भर पडली आहे.

मायकेल गिफ्किन्स पुरस्कारांच्या नामांकन यादीत श्रिया भागवत
Senior colorist Ashok Mulye majha puraskar award ceremony
परोपकारात रमलेला रंगकर्मी
president droupadi murmu presents bharat ratna awards at rashtrapati bhavan
राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा