17 January 2021

News Flash

‘आणि तरीही म्हणतात की बॉलिवूड….’, तापसी पन्नूचं विकास दुबे एन्काउंटरवर ट्विट

तिने ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली आहे.

उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या कुख्यात गुंड विकास दुबे याला ठार करण्यात आले आहे. विकास दुबेला अटक केल्यानंतर विशेष पथक त्याला घेऊन कानपूरला चालले होते. यावेळी पोलिसांच्या ताफ्यातील एका वाहनचा अपघात झाला. त्यानंतर विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि विकास दुबे यांच्यात गोळीबार झाला. दरम्यान पोलिसांनी विकास दुबेला ठार केले. या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेकजण त्यांच्या प्रतिक्रिया देत आहे. अभिनेत्री तापसी पन्नूने देखील तिची प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेत्री तापसी पन्नूने ट्विटरद्वारे विकास दुबे एन्काऊंटरवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘असं होईल याचा विचारही आम्ही केला नव्हता. आणि मग सगळे म्हणतात की बॉलिवूड चित्रपटांच्या कथा या वास्तवदर्शी नसतात’ असे तिने ट्विटमध्ये म्हटले आहे.

विकास दुबेच्या अटकेपासून ते एन्काउंटरपर्यंत हे एका चित्रपटाच्या कथे प्रमाणे घडल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. विकास दुबे मध्य प्रदेशातील महाकाल मंदिरात गेला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला. गुरुवारी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. नंतर उत्तर प्रदेशांचे विशेष पोलीस पथक विकास दुबेला घेऊन कानपूरसाठी सकाळी निघाले होते. यावेळी पोलिसांच्या ताफ्यातील एका वाहनाचा अपघात झाला आणि गाडी पलटली. गाडीचा अपघात झाल्यानंतर विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.

विकास दुबेने पोलिसांचे शस्त्र खेचून घेत गोळीबार करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी विकास दुबेला आत्मसमर्पण करण्यास सांगितले पण त्याने माघार घेतली नाही. विकास दुबेने केलेल्या गोळीबारात विशेष पथकातील दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. पोलिसांच्या गोळीबारात विकास दुबे जखमी झाला असता त्याला रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हा घटनाक्रम एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे वाटत असल्याने तापसीने अप्रत्यक्षपणे म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 10:58 am

Web Title: tapsee pannu reaction on vikas dubey encounter avb 95
Next Stories
1 टायगर श्रॉफला जमिनीवर झोपलेला पाहून आई म्हणाली…
2 ‘आता सर्व काही बदलले आहे’, दिल बेचारा चित्रपटाचे दिग्दर्शक झाले भावूक
3 Video : “उसी को देखकर जीते है..”; सुशांतने अंकिताबद्दलचं प्रेम केलं होतं व्यक्त
Just Now!
X