20 October 2019

News Flash

या प्रसिद्ध अभिनेत्रीला करायचंय विकी कौशलशी लग्न

"मला विकीशी लग्न करायला आवडेल कारण तो मॅरेज मटेरिअल आहे"

विकी कौशल

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने आतापर्यंत ‘पिंक’, ‘नाम शबाना’, ‘बदला’ अशा चित्रपटांमधून प्रेक्षकांवर अभिनयाची छाप पाडली आहे. २०१८ साली आलेल्या ‘मनमर्झियाँ’ या चित्रपटात तापसी आणि सध्या सुपरहिट असलेला अभिनेता विकी कौशल यांची जोडी दिसली होती. तापसीचा हा सहकलाकारच आता तिचा खूप जवळचा मित्र झाला आहे. ती तर त्याला चक्क ‘मॅरेज मटेरिअल’ म्हणूनच संबोधते.

‘कलर्स इन्फिनिटी’वरील एका मुलाखतीत तापसीने विकीचे मनापासून कौतुक केले. ती म्हणाली की, “सगळे पुरुष मूर्ख असतात पण विकी सर्वोत्कृष्ट माणूस आहे. अनुराग कश्यप यांच्या चित्रपटात काम करण्यापूर्वी आम्ही व्हॉट्स अॅपवर बऱ्याच गप्पा मारल्या होत्या. सेटवर भेटण्याआधीच आमची खूप छान मैत्री झाली होती.”

“तापसीच्या स्वभावातील चांगली गोष्ट म्हणजे ती मनाने खूप स्वच्छ आहे. ती खूप छान बोलते. मी एक उत्तम श्रोता आहे त्यामुळे तिच्या गप्पा ऐकायला मजा येते.” असं विकी कौशल म्हणाला. लग्नाविषयी विकीला विचारलं असता, “सध्या तरी माझा तसा काही विचार नाही. आतापर्यंत मला कोणीच लग्नामध्ये नाचायला बोलावलेलं नाही.” असंही तो म्हणाला. “लग्नात नाचण्यासाठी तू किती पैसे घेशील?” असं विकीला विचारलं असता “एक रुपया” असं तो मस्करीत म्हणाला.

“वरूण धवन, विकी कौशल आणि अभिषेक बच्चन यांच्यापैकी कोणाशी तू लग्न करशील, कोणाला मारशील आणि कोणासोबत राहशील?” असा प्रश्न तापसीला विचारला असता,” मी वरूण धवनसोबत राहीन, अभिषेक बच्चनला मारेन आणि मला विकीशी लग्न करायला आवडेल कारण तो मॅरेज मटेरिअल आहे,” असं तिने सांगितलं

First Published on May 15, 2019 5:43 pm

Web Title: tapsee pannu says vickey kaushal is marriage material