16 September 2019

News Flash

तापसी पडली प्रेमात, प्रथमच बॉयफ्रेंडबद्दल केला खुलासा

तापसीची बहिण शगुनने त्या दोघांची भेट घालून दिली आहे

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू बी-टाऊनमधील सध्याची लोकप्रिय अभिनेत्री आहे. काही दिवसांपूर्वी तापसीचा ‘मिशन मंगल’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिवर चांगली कमाई केली. तापसी आता लवकरच अनुराग कश्यपच्या ‘सांड की ऑंख’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. सध्या तापसी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. तापसी नेहमी तिच्या प्रोफेशनल लाईफबद्दल उघडपणे बोलत असते. आता तापसीने तिच्या खासगी आयुष्याबद्दलही वक्तव्य केले आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीमध्ये तापसीला तिच्या खासगी आयुष्याबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले होते. तापसीने ती सिंगल नसल्याचे सांगितले आहे. त्यानंतर तापसी कोणासोबत रिलेशनशीपमध्ये असेल असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. काही वेळातच तापसीने ती व्यक्ती फिल्म इंडस्ट्रीमधील नसून इतर कुणीतरी असल्याचा खुलासा केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तापसीची बहिण शगुनने त्या दोघांची भेट घालून दिली आहे. योग्य वेळ पाहून तापसी लग्नबंधनात अडकणार आहे. तिच्या लग्नसोहळ्यात कुटूंबीय आणि जवळच्या मित्रपरिवाला आमंत्रण देण्यात येणार आहे. दरम्यान लग्नाचे सगळे विधी एका दिवसात पार पाडण्यात येणार असल्याचेदेखील तापसीने सांगितले आहे.

तापसी अनुभव सिन्हाच्या ‘थप्पड’ चित्रपटात देखील झळकणार आहे. या चित्रपटात ती अमृता प्रीतम यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाल्याचे तापसीने सोशल मीडियावर फोटो शेअर करत सांगितले आहे.

First Published on September 11, 2019 1:21 pm

Web Title: tapsee pannu spoke about his boyfriend first time avb 95