करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अनेक मालिकांचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे. त्यामुळे अनेक कलाकारांवर आर्थिक संकट आले. आता काही मालिकांचे चित्रीकरण महाराष्ट्राच्या बाहेर सुरु आहे. दरम्यान छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये नट्टू काकांची भूमिका साकारणारे घनश्याम नायक यांच्याविषयी जोरदार चर्चा सुरु आहेत. त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले असल्याचे म्हटले जात आहे. पण एका मुलाखतीमध्ये नट्टू काकांनी या सर्व अफवा असल्याचे म्हटले आहे.

नुकताच घनश्याम नायक यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट केले. ‘माझ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे अशा अफवा ऐकून मला धक्का बसला. कळत नाही लोकं अशा निगेटिव्ह गोष्टी का परसवतात. सध्या तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेचे महाराष्ट्राबाहेर चित्रीकरण सुरु आहे. या शोमधून मला ब्रेक देण्यात आलेला नाही. सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्येष्ठ कलाकार महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन चित्रीकरण करण्यास तयार नाहीत आणि ते त्यांच्यासाठी सेफ देखील नाही’ असे नट्टू काका म्हणाले.

आणखी वाचा : जेठालालच्या ‘गडा इलेक्ट्रॉनिक्स’ दुकानाचा कोण आहे मालक? जाणून घ्या

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेचे निर्माते त्यांची योग्य काळजी घेत असल्याचे घनश्याम यांनी म्हटले आहे. तसेच ते लवकरच पुन्हा चित्रीकरणास सुरुवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिका गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. जेठालाल, बबिता, टप्पू, चंपकलाल, दयाबेन, नट्टू काका या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.