29 September 2020

News Flash

‘तारक मेहता…’मध्ये होणार दया बेनची एण्ट्री?

आगामी भागात दिशाची एण्ट्री होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

लॉकडाउननंतर छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मालिकेचे नवे एपिसोड पुन्हा पाहायला मिळत असल्यामुळे चाहते आनंदी असल्याचे दिसत आहे. ही मालिका टीआरपीच्या यादीमध्ये देखील टॉपमध्ये असते. आता मालिकेमध्ये पुन्हा दया बेन म्हणजेच दिशा वकानीची एण्ट्री होणार असल्याचे म्हटले जात आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेच्या आगामी भागात रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या स्पेशल भागात दिशा वकानीची पुन्हा मालिकेत एण्ट्री होणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे चाहते आनंदी असल्याचे दिसत आहे. पण सुरु असेलेल्या या चर्चांवर निर्मात्यांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

यापूर्वी मालिके काम करणाऱ्या जेनिफरने दिशा वकानीची पुन्हा मालिकेत एण्ट्री होऊ शकते असे म्हटले होते. पण सध्या दिशा तिच्या मुलीकडे लक्ष देत आहे. त्यामुळे मालिकेत येण्यासाठी तिच्यावर दबाव टाकणे चुकीचे ठरेल असे म्हटले होते. गेल्या २ वर्षांपासून चाहते दिशाला पुन्हा मालिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 11:34 am

Web Title: tarrak mehta ka oolta chashma disha vakani returning on show avb 95
Next Stories
1 ‘फुटपाथवरील जीवन जगताना..’; अमित साधने सांगितली स्ट्रगल काळातील आठवण
2 ‘बिग बॉस १३’चा स्पर्धक असिम रियाजवर अज्ञातांनी केला हल्ला
3 दिशा पटानीच्या वडिलांना करोनाची लागण
Just Now!
X