News Flash

आशुतोषसोबतच्या नात्यावरुन सुरु असलेल्या चर्चेवर तेजश्री प्रधानचा खुलासा

आशुतोषने तेजश्रीच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या फोटोंमुळ ते एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत अशा चर्चा रंगल्या होता.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे ‘अग्गंबाई सासूबाई.’ अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. या मालिकेतील बबड्या आणि शुभ्राच्या जोडीला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळाले होते. बबड्याची भूमिका अभिनेता आशुतोष पत्कीने साकारली होती तर शुभ्रा हे पात्र अभिनेत्री तेजश्री प्रधानने साकारले होते. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी आशुतोष आणि तेजश्री हे चर्चेत असतात. ते सतत एकमेकांच्या फोटोवर कमेंट करताना दिसतात. त्यामुळे ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत अशा चर्चा रंगल्या होत्या. आता एका मुलाखतीमध्ये तेजश्रीने यावर खुलासा केला आहे.

२ जून रोजी तेजश्रीचा वाढदिवस होता. त्या निमित्ताने आशुतोष पत्कीने एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टवरुन त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. आता तेजश्रीने एका मुलाखतीमध्ये यावर वक्तव्य करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ‘आशुतोष हा माझा खूप चांगला मित्र आहे. त्यामुळे त्याने माझ्या वाढदिवसानिमित्त एक फोटो पोस्ट केला. मालिका सुरु असताना आमच्यात काही तरी सुरु आहे अशा चर्चा व्हायच्या. त्यामुळे माझ्यासाठी हे काही नवीन नाही. पण आमच्यात मैत्रीपलिकडे काहीच नाही’ असे तेजश्री म्हणाली.

आणखी वाचा : द अंडरटेकरने अक्षयला रिअल फाईटचं दिलं आव्हान, खिलाडी कुमार म्हणाला..

 

View this post on Instagram

 

A post shared by (@tejashripradhan)

काय होती आशुतोषची पोस्ट?

आशुतोषने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तेजश्रीसोबतचा फोटो शेअर करत दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. ‘माझी बेस्ट फ्रेंड.. मला तुला सांगायचे आहे की तू माझ्यासाठी खूप काही आहेस. तू मला आतापर्यंत दिलेला पाठिंबा, प्रोत्साहन आणि मी एक चांगला व्यक्ती व अभिनेता होण्यासाठी मला केलेली मदत यासाठी मी मनापासून तुझे आभार मानतो. वाढदिवशी मी तुला दोन टीप्स देतोय. पहिली म्हणजे भूतकाळ विसर कारण आपण तो बदलू शकत नाही. दुसरी टीप म्हणजे गिफ्ट विसरून जा… ते मी तुझ्यासाठी आणलंच नाही. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा’ असे त्याने कॅप्शनमध्ये म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2021 8:52 am

Web Title: tejashree pradhan talk about his relationship with aggabai sasubai fame ashutosh patki avb 95
Next Stories
1 कलर्स मराठीवर आजपासून ‘जीव माझा गुंतला’ मालिका
2 फादर्स डे निमित्त कंगनाने व्यक्त केल्या वडिलांसाठीच्या भावना; म्हणाली, “स्वखुशीने व्हिलन बनत होते…”
3 अनुष्का शर्माने वडिलांसह विराट कोहलीसोबतचा फोटो शेअर केला; म्हणाली, “जगातले सर्वोत्कृष्ट पिता…”
Just Now!
X