04 July 2020

News Flash

या मालिकेने तेजस्विनीच्या पाठीवर दिली आयुष्यभराची खूण; शूटिंगदरम्यानचा ‘तो’ किस्सा

हार न मानता तेजस्विनीने संपूर्ण मालिकेत 'ती' खूण मिरवली.

तेजस्विनी पंडित

चित्रपट किंवा मालिकेच्या शूटिंगदरम्यान घडलेले काही किस्से आयुष्यभर लक्षात राहतात. काही घटना आयुष्यभरासाठी एक खूण देऊन जातात. पण त्या घटनेकडे सकारात्मक दृष्टीने पाहायचं की नकारात्मक हे त्या व्यक्तीवर असतं. अभिनेत्री तेजस्विनी पंडितसोबत एका शूटिंगदरम्यान अशीच एक घटना घडली. ज्या घटनेने तिच्या पाठीवर आयुष्यभरासाठी एक खूण दिली. मात्र हीच खूण संपूर्ण मालिकेत मिरवत तेजस्विनीने शूटिंग पूर्ण केलं. ‘१०० डेज’ असं या मालिकेदरम्यान घडलेला किस्सा सांगत तेजस्विनीने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली.

‘१०० डेज’ या मालिकेत तेजस्विनीने आदिनाथ कोठारेसोबत काम केलं होतं. विशेष म्हणजे ती खलनायिकेच्या भूमिकेत होती. या मालिकेचं शीर्षकगीत शेअर करत तेजस्विनीने लिहिलं, ‘या शोने मला खूप वेगळा अनुभव दिला. आयुष्यभराची एक खूण पण. (हे टायटल साँग शूट करताना माझ्या पाठीत आरसा पडला.) पण तुम्हाला माहितंच असेल की मी साहसी व लढाऊ प्रवृत्तीची आहे आणि त्या खूणने मला आणखीन सुंदर बनवलं. संपूर्ण मालिकेत मी डीप नेक (deep neck) ब्लाऊज घालून ती खूण मिरवली. असो, मला या शोने एका वेगळ्या प्रसिद्धीच्या झोतात नेऊन ठेवलं. मी Antogonist म्हणजेच खलनायिका असून सुद्धा राणी सरदेसाई शेवटच्या क्षणापर्यंत पकडली जाऊ नये असं प्रेक्षकांना वाटणं हेच त्या पात्राचं यश होतं. आणि यात seductress चा रोल निभावताना माझे मध्यम वयोगटातील पुरूष चाहते होतेच, पण पोलीस कर्मचारी, लहान मुलं, बायका आणि वयोवृद्ध तरुणही चाहते झाले हे आज सांगताना मज्जा वाटते.’

View this post on Instagram

#Nostalgia ह्या शो ने मला खूप वेगळा अनुभव दिला. आयुष्यभराची एक खूण पण. ( हे टायटल साँग शूट करताना माझ्या पाठीत आरसा पडला ) पण as u know I have always been a fighter & that scars make u beautiful. I flaunted it in the whole show wearing the deep back blouses. असो, मला ह्या शो ने एक वेगळ्या प्रसिद्धीच्या झोतात नेऊन ठेवलं. मी " Antogonist " म्हणजेच खलनायिका असून सुद्धा राणी सरदेसाई शेवटच्या क्षणापर्यंत पकडली जाऊ नये असं प्रेक्षकांना वाटणं हेच त्या पात्राचं यश होतं. आणि ह्यात seductress चा रोल निभावताना माझे मध्यम वयोगटातील पुरूष Fans होतेच, पण पोलिस कर्मचारी, लहान मुलं, बायका आणि वयोवृद्ध तरुणही Fans झाले हे आज सांगताना मज्जा वाटते. . . P.S अजय ठाकुर ( Adinath ) बरोबर शो मध्ये जरी कधी राणीचं जमलं नसलं तरी off screen मात्र माझी आणि Adi ची छान गट्टी जमली. . . हा अनुभव मला घेऊ दिल्याबद्दल माझ्या 100days च्या टीमचे आणि @zeemarathiofficial चे मनःपूर्वक आभार ! #zeemarathi #100days #ranisardesai #4yearsback #tejaswinipandit

A post shared by Tejaswini Pandit (@tejaswini_pandit) on

या मालिकेचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही मालिका शंभर भागांचीच होती. शंभर दिवसात उलगडणा-या रहस्याचा उत्कंठावर्धक प्रवास या मालिकेतून प्रेक्षकांना बघायला मिळाला होता. एका रहस्याची, त्या रहस्यामागे असणाऱ्या व्यक्तीची आणि त्या रहस्याचा शोध घेणाऱ्या प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याची ही गोष्ट होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2020 1:56 am

Web Title: tejaswini pandit recounts how she flaunted a scar on her back while shooting for her show 100 days ssv 92
Next Stories
1 “हे घर नाही तर स्वर्ग”; कंगनाने बहिणीसाठी तयार केलं आलिशान घर
2 करोनासाठी शाहरुखच्या ऑफिसचा वापर, रुग्णांचं केलं विलगीकरण
3 चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या मोहिमेत मिलिंद सोमणचा पुढाकार; घेतला ‘हा’ निर्णय
Just Now!
X