News Flash

‘ये है मोहोब्बते’ फेम अभिनेता अडकणार लग्नाच्या बेडीत

काही दिवसांपूर्वीच त्याचा साखरपुडा झाला

संग्राम सिंग

टेलिव्हिजन विश्वात सध्याच्या घडीला लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या मालिकांमध्ये ‘ये है मोहोब्बते’चे नाव घेतले जाते. या मालिकेतील जवळपास प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे. मग ती प्रेमळ ‘इशिमा’ म्हणजेच दिव्यांका त्रिपाठी असो, ‘रमणकुमार भल्ला’ म्हणजे अभिनेता करण पटेल असो किंवा मग खलनायकी भूमिकेत झळकलेला ‘अशोक’ म्हणजेच अभिनेता संग्राम सिंग असो. या मालिकेच्या निमित्ताने संग्रामनेही प्रेक्षकांची मनं जिंकली. त्याच्या उपद्रवी बुद्धीसोबतच रुबाबदार अंदाज अनेकांची विशेषत: तरुणींची मनं जिंकून गेला. पण, आता मात्र संग्रामच्या ‘फिमेल फॅन फॉलोअर्स’ना धक्का बसू शकतो. कारण अशोक म्हणजेच संग्राम डिसेंबर महिन्याच्या २५ तारखेला लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना संग्रामने याविषयीची माहिती दिली. ‘२५ डिसेंबरला मी गुरकिरन कौर हिच्यासोबत विवाह बंधनात अडकणार आहे. गुरकिरन मुळची नॉर्वेची आहे. आमचे लग्न अरेंज्ड मॅरेज आहे. पण तिच्याहून आणखी चांगली साथीदार मला आणखी कुठे भेटू शकली असती असे मला वाटत नाही’, असे संग्राम म्हणाला. त्याच्या लग्नाची बातमी कळताच मालिकेतील सहकलाकार अॅली गोनी यानेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन संग्राम आणि गुरकिरनचा फोटो शेअर केला. या फोटोसोबत त्याने एक विनोदी कॅप्शन देत संग्रामला शुभेच्छा दिल्या आहेत. संग्रामनेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटसोबत होणाऱ्या पत्नीसोबतचा फोटो शेअर करत ‘टेकन’ असे कॅप्शन दिले आहे.

पाहा : VIDEO : ‘घुमर’ करत दीपिका म्हणतेय ‘दिसला गं बाई दिसला’

आपल्या लग्नाविषयी आणखी माहिती देत संग्राम म्हणाला, ‘आम्हा दोघांची कुटुंबं बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. आम्ही दोघं (गुरकिरन आणि मी) एकमेकांसाठी योग्य जोडीदार आहोत असे त्यांचे मत होते. त्यामुळेच त्यांनी आमची भेट घडवून आणली. त्यांचे म्हणणे बहुधा आधीपासूनच बरोबर होते, याचा मला प्रत्यय आला. काही दिवसांपूर्वीच माझा साखरपुडाही झाला आहे. माझ्या आणि गुरकिरनच्या नात्याविषयी जाणून बऱ्याच मित्रांना धक्का बसला.’

पंजाबी चित्रपटांमध्ये झळकलेल्या संग्रामने विविध मालिकांमध्येही भूमिका साकारल्या. पण, त्याला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली ती म्हणजे ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘ये है मोहोब्बते’ या मालिकेमुळे. काही दिवसांपासून या मालिकेत झळकला नसला तरीही येत्या काही दिवसांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या भागांमध्ये तो एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2017 9:48 am

Web Title: television serial yeh hai mohabbateins ashok aka sangram singh to get married on december 25
Next Stories
1 शब्दांच्या पलिकडले : नीले गगन के तले…
2 …म्हणून महिमाची बॉलिवूडमधून ‘एक्झिट’
3 माहिरा खान आणि तिची आई झाली ‘ऑटो करेक्ट’ची शिकार
Just Now!
X