News Flash

द्रष्टी धामन ‘झलक दिखला जा ६’ची विजेती

टीव्ही कलाकार द्रष्टी धामन ही 'झलक दिखला जा ६'ची विजेती ठरली आहे.

| September 15, 2013 11:20 am

टीव्ही कलाकार द्रष्टी धामन ही ‘झलक दिखला जा ६’ची विजेती ठरली आहे. तिला नृत्य दिग्दर्शक सलमान खानची साथ लाभली होती. शो च्या सुरुवातीपासूनच द्रष्टीने तिच्या धडाकेबाज परफॉर्मन्सने परिक्षकांचे आणि प्रेक्षकांचे मन जिंकले होते. झलकच्या फायनलमध्ये तिने ‘रंगिला रे’ गाण्यावर नृत्य सादर केले होते. यावेळी ‘क्रिश ३’ च्या प्रोमोशनसाठी  शोमध्ये आलेल्या हृतिक रोशननेही तिनही परिक्षकांसोबत तिच्या नृत्याची प्रशंसा केली.
द्रष्टी आणि सलमानला ट्रॉफी आणि ५० लाख रुपयांचा धनादेश करण जोहर आणि रेमो डिसोजाच्या हस्ते देण्यात आला. मात्र, द्रष्टीची प्रतिस्पर्धी लॉरेन गॉटीलेबला दुस-या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्यानंतर सोनाली आणि सुमंथ तर शेवटच्या स्थानी चौथ्या क्रमांकावर शान आला.
माधुरी दीक्षित, करण जोहर आणि रेमो डिसोजा परिक्षण करत असलेला ‘झलक दिखला जा’ हा रियालिटी कार्यक्रम तब्बल १५ आठवडे चालला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2013 11:20 am

Web Title: televisions madhubala drasthi dhami wins jhalak dikhhla jaa 6
Next Stories
1 ‘बिग बॉस ७’च्या स्पर्धकांची नावे जाहीर
2 सिनेमात स्थिरावण्यासाठी ग्लॅमर तडका हवा…
3 मराठी दिग्दर्शक हिंदीकडे…यशस्वीही व्हा
Just Now!
X