21 September 2020

News Flash

‘ठाकरे’ कमाईतही बापरे…पहिल्या आठवड्यात कमावले इतके कोटी

पहिल्या तीन दिवसांत चित्रपटाने जवळपास २३ कोटींची कमाई केली होती

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरु आहे. नवाजुद्दीन प्रमुख भूमिकेत असलेल्या ठाकरे चित्रपटाने पहिल्या आठवड्यात तब्बल ३१.६० कोटींची कमाई केली आहे. पहिल्या तीन दिवसांत चित्रपटाने जवळपास २३ कोटींची कमाई केली होती. ठाकरे चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन भाषांत प्रदर्शित करण्यात आला आहे.

ठाकरे चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी सहा कोटींची तर दुसऱ्या दिवशी १० कोटींची कमाई केली होती. तिसऱ्या दिवशी ६.९० कोटींची कमाई केल्यानंतर तीन दिवसांत आकडा २३ कोटींवर पोहोचला होता.

ठाकरे चित्रपटासोबत कंगनाचा झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मणिकर्णिकामुळे ठाकरे चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होईल अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र ठाकरे चित्रपट आपला प्रेक्षक चित्रपटगृहापर्यंत आणण्यात यशस्वी ठरला आहे. पण कमाईच्या बाबतीत बोलायचं झाल्यास मणिकर्णिकाने बाजी मारली आहे.

कंगनाचा ‘मणिकर्णिका’ हिंदी, तामिळ आणि तेलुगू तीन भाषांत रिलीज करण्यात आला असून ३ हजार स्क्रीनवर प्रदर्शित झाला. तर ‘ठाकरे’ २ हजारपेक्षा अधिक स्क्रीनवर दाखविण्यात आला. पहिल्या तीन दिवसांत कंगनाच्या ‘मणिकर्णिका’ची कमाई ४२.५५ कोटी रुपये इतकी झाली होती. पाच दिवसांत चित्रपटाने ५० कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2019 1:27 am

Web Title: thackeray film earns 31 60 crore in first week
Next Stories
1 Anandi Gopal Trailer : सामान्य जोडप्याची, असामान्य गोष्ट !
2 कपिल देवच्या बायोपिकमध्ये साहिल खट्टरची वर्णी, साकारणार ‘या’ क्रिकेटपटूची भूमिका
3 ‘या’ प्रसिद्ध फॅशन डिझायनरला कॉपी केल्यामुळे दिव्यांका ट्रोल
Just Now!
X