बॉलिवूडची क्वीन म्हणजेच अभिनेत्री म्हणजे कंगना रणौतचा आज वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्ताने ‘थलायवी’ या तिच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री आणि अभिनेत्री जयललिता यांच्या आयुष्यावर आधारीत आहेत.

ट्रेलरमध्ये एका अभिनेत्री पासून तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदापर्यंतचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास दाखवण्यात आला आहे. सोबतच, कंगना आणि अरविंद स्वामी यांनी जयललिता आणि एमजीआर यांचे नाते कसे होते ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कंगनाने या ट्रेलरमध्ये जयललिता यांच्या भूमिकेत राहून उत्तम अभिनयासोबतच उत्तम डान्सही केला आहे. ट्रेलरमध्ये राजकीय जीवनात जयललिता यांना कोणत्या गोष्टींचा सामाना करावा लागला हे दाखवण्यात आले आहे. या भूमिकेसाठी कंगनाला २० किलो वजन वाढवावे लागले होते.

थलायवी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होण्याआधी प्रेस कॉन्फरसंचे आयोजन केले होते. यात कंगनासोबत दिग्दर्शक एएल विजय आणि अरविंद स्वामी, नासिर, जीवी प्रकाश, समुथ्राकणी, थांबी रमैया देखील उपस्थित होते. हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून २३ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.